बेधडक मी मराठी न्यूज शहादा

शहादा:- नगरपालिका निवडणुकीसाठी दिनांक 13 नोव्हेंबर रोजी भाजपा कडून नगराध्यक्ष पदासाठी प्राचार्य मकरंद पाटील व 13 प्रभागासाठी सौ माधवी मकरंद पाटील यांचे अर्ज दाखल झाले आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर झाल्या अजून पर्यंत नगरसेवक पदा साठी भारतीय जनता पक्षाकडून प्रभागांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. प्रभागात कोणाकोणाला नगरसेवक पद मिळते याकडे साऱ्यांचे लक्ष टिकून आहे. त्यामुळे निवडणुकीच्या नगरसेवक पदाच्या फॉर्म भरण्यासाठी दिनांक 10 नोव्हेंबर पासून सुरुवात झाली तरीदेखील 13 तारखेपर्यंत केवळ दोनच उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहे. काय प्रभागांमध्ये भाजपा उमेदवार निश्चिती झाल्याने त्यांनी प्रचाराला सुरुवात केल्याचे देखील चित्र आहे. भाजपा श्रेष्ठी काय निर्णय घेतात त्यानंतरच अर्ज दाखल केले जातील अशी चिन्ह आहेत. तर दुसरीकडे जनता विकास आघाडी यांनी प्रचार सभा घेऊन 29 उमेदवार फिक्स झाल्याचे घोषित केले असून नगराध्यक्ष पदासाठी स्वतः अभिजीत दादा उभे राहणार असल्याचे जाहीर केले आहे.
सध्या तरी तिसरी आघाडी किंवा तिसरा गट उभा राहील किंवा काय याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही 17 नोव्हेंबर असून शेवटचे चार दिवस शिल्लक असताना उमेदवारांना आपली उमेदवारी दाखल करण्यासाठी लगीन घाई करावी लागेल. काही नगरसेवक ही मुहूर्त देखील शोधून आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची दाट संभावना आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतरच चित्र स्पष्ट होईल. तोपर्यंत नागरिकांमध्ये ठिकठिकाणी चर्चासत्र रंगल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीच्या फिवर मोठ्या प्रमाणात असून राजकीय वातावरण तापल्याचे चिन्ह साधे शहरात दिसत आहे.