बेधडक मी मराठी न्यूज शहादा

शहादा:- येथील पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी १२ तर नगरसेवक पदासाठी १९९ नामनिर्देशन पत्र उमेदवारी दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत दाखल झाले होते.पैकी आज छाननी अंती १९ नामांकन अर्ज विविध कारणांनी अवैध ठरवण्यात आल्याने १८० नामांकन अर्ज वैध ठरवण्यात आले.
येथील पालिकेची एक लोकनियुक्त नगराध्यक्ष व २९ नगरसेवक पदासाठी निवडणूक होत असून या निवडणुकीत विविध इच्छुकांनी २११ नामांकन अर्ज दाखल केले आहेत. मंगळवारी सकाळी पालिकेचा सभागृहात उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत छाननी करण्यात आली. छाननी अंती १८०नामांकन अर्ज वैध करण्यात आले तर १८ नामांकन अर्ज विविध कारणांनी अवैध ठरवण्यात आले. दरम्यान छान प्रसंगी उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.