बेधडक मी मराठी न्यूज तालुका प्रतिनिधी हेमंत मराठे मो.9689840855

तळोदा:- शहरातील नेमसुशिल शैक्षणिक समूहात संविधान रॅली भीम गीत गायन व्याख्यान व निबंध स्पर्धेच्या माध्यमातून संविधान दिवस साजरा करण्यात आला.कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून समाज कल्याण विभागाच्या समता दूत कल्पना ठाकरे मुख्या.श्रीमती पुष्पा बागुल प्राचार्य सुनिल परदेशी प्रिन्सिपल पी डी शिंपी मुख्या.भावना डोंगरे मॅडम मुख्या. गणेश बेलेकर सर उपस्थित होते.
प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते संविधान उद्देशिका व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी शिक्षक अरुण कुवर यांनी संविधानाचा प्रवास ,निर्मिती व उद्देशिकाचे वाचन करून रथ समतेचा हे भीम गीत सादर केले.प्रा.आय.पी.बैसाने यांनी संविधानाचे महत्व विशद केले शिक्षिका रेखा मोरे यांनी बुद्ध आणि भीमराव यांना वंदनीय गीत सादर केले तर प्रतिभा बैसाने यांनी उपकार भिमाचे गाणी सादर करून वातावरण निर्मिती केली.
कार्यक्रमाला विद्यामंदिरातील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अरुण कुवर यांनी मानले . तसेच रवींद्र गुरव सचिन पंचभाई सागर मराठे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले