बेधडक मी मराठी न्यूज तालुका प्रतिनिधी हेमंत मराठे
मो.9689840855

तळोदा – दि 27/11/2025 रोजी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीनिमित्त तळोदा येथे आनंद चौकात म. उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या ठिकाणी भाजपाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष विश्वासराव मराठे ,रोहित विश्वासराव मराठे तसेच विकी खरात यांनी भारतीय जनता पार्टीला अखेरच्या निरोप देत कायमचा रामराम ठोकला. व शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. आगामी नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर हा प्रवेश सोहळा महत्त्वाच्या मानला जात आहे .महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पक्षात प्रवेश केल्याने स्थानिक पातळीवर भाजपाला मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजपाच्या मोठ्या पदाधिकाऱ्यांना आपल्याकडे वळून राजकीय पटलावर आपली ताकद दाखवून दिल्याचे चित्र उमटल्याचे दिसत आहे.
पक्षप्रवेश करतेवेळी अक्कलकुवा धडगाव मतदार संघाचे कर्तव्यदक्ष लाडके आमदार आमश्या दादा पाडवी तसेच विधानसभा आमदार चंद्रकांतजी रघुवंशी तळोदा येथील जेष्ठ कार्यकर्ते गौतमचंद जैन, हितेंद्र क्षत्रिय, राम भैय्या रघुवंशी, अनुपजी उदासी, जितेंद्र दुबे आदी मान्यवर उपस्थित होते.