रांझणी ते रांझणी फाटा रस्त्यावरील खोलगट खड्ड्याचे काँक्रीटीकरण करीत शेतकरीने ठेवला आदर्श.. 

 

बेधडक मी मराठी न्यूज तालुका

प्रतिनिधी हेमंत मराठे 

 मो. 9689840855

 

  तळोदा– तालुक्यातील रांझणी ते रांझणी फाटा ह्या तळोदाकडे जाणाऱ्या रस्त्यावर रांझणी जि प शाळाजवळ तसेच पुढे काही अंतरावर मोठे खोलगट खड्डे तयार झाले होते. त्यामुळे या मार्गावरून मार्गक्रमण करताना पादचारी,वाहनधारक यांचे वाहन समोरासमोर येत असल्याने वाहनधारकांची चांगलीच भंबेरी उडत असल्याचे चित्र होते. ही बाब लक्षात घेता रांझणी येथील प्रगतीशील शेतकरी महेंद्र दामोदर भारती यांनी त्यांच्या पत्नी रोहिणी भारती,शेतातील शेतगडी संतोष पाडवी, अनिल पाडवी यांना मदतीला घेत आपल्या कारने जाड खडी,कच,वाळू,सिमेंट आणत खोलगट खड्डा चांगल्या प्रकारे झाडून त्याच्यात खडी टाकून रेती तसेच सिमेंट, कच यांचे मिश्रण करून काँक्रिटीकरण केले. त्यामुळे रस्ता वाहतूक सुरळित होण्यास मदत होणार आहे.

दरम्यान या रस्त्यावरून जांबाई,पाडळपूर,गोपाळपूर, जीवननगर पुर्नवसन, रांझणी येथील ग्रामस्थाचा तळोदा येथे जाण्यासाठी वर्दळ राहत असून तसेच सध्या ऊस वाहतूक, पपई केळी काढणी सुरू असून अवजड वाहने या मार्गावरून मार्गक्रमण करीत असल्याने महेंद्र भारती पुढाकार घेत खड्डे बुजवल्याने सर्व स्तरातून समाधान व्यक्त होत आहे आणि त्यांचे कौतुकही होत आहे.,त्यांनी बेधडक मी मराठी न्यूज शी बोलताना सांगितले की

भारत माझा देश असून येथील माती हेच माझ्यासाठी सर्वस्व आहे. मला ज्याप्रमाणे माझे हक्क समजतात, त्याच पद्धतीने मला माझे कर्तव्यही समजायला पाहिजे अशी प्रत्येकाची भावना असायला हवी. राष्ट्रप्रेमाच्या माझ्या स्वतःच्या काही संकल्पना शालेय जीवनापासून तयार झालेल्या आहेत, त्या मी जपतो.

महेंद्र दामोदर भारती.

रांझणी.

स्वस्त औषधी केंद्रातून गरजूंना घरपोच सेवा

महेंद्र भारती यांच्याकडून तळोदा शहरात स्वस्त औषधी केंद्र सुरू असून त्यांच्याकडून माफक दरात जेष्ठ, गरजू रुग्णांना घरपोच औषधे पोहोच करण्यात येत असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *