बेधडकनी मी मराठी न्यूज शहादा

शहादा :- म्हसावद पोलीस ठाणे हद्दीत आज दि.१३/१२/२०२५ रोजी सपोनि/ नितिन कामे सो, यांना गुप्तबातमी दारामार्फत बातमी मिळाली कि, धडगांव गावाकडुन फत्तेपुर गावाकडे रोडने दोन पिकअप वाहनामधे गोवंश जातीचे बैल ** कत्तलीसाठी घेवून येत आहे. अशी बातमी मिळाल्याने सपोनि/नितीन कामे व स्टॉफ असे सरकारी वाहनाने रवाना होवुन फत्तेपुर गावात बस्थानकजवळील हनुमान मंदिराच्या पाठीमागे जावुन दबा धरुन थांबलेलो असतांना सका. 10.00 वाजेच्या सुमारास रामपुर गावाकडुन फत्तेपुर गावाकडे येणाऱ्या रोडने दोन पिकअप वाहन येतांना दिसले सदर पिकअप वाहनांना थांबविले असता, सदर वाहनांवरील चालक हे वाहन थांबवुन वाहन सोडुन पळुन गेले त्यांचा पाठलाग करता ते मिळून आले नाही. दोन पंचासमक्ष सदर पिकअप वाहनाची पाहणी केली असता पिकअप वाहन क्र.MH-14-AZ-5377 मध्ये गोवंश जातीचे बैल व जर्सी वासरु असे एकुण 12 तसेच पिकअप वाहन क्र. MH-18-M-6360 हिच्यामध्ये पाहणी केली असता गौवंश जातीचे एकुण 10 बैलांचे मागचे व पुढचे दोन्ही पाय व मुसक्या दोरीने बांधुन निर्धयतेने एकावर एक ठेवलेले दिसुन आले. असे दोन्ही वाहनामधे एकुण-22 गोवंश जातीचे बैल व जी वासरु हे वर नमूद पिकअप वाहनात विनापरवाना कत्तलीसाठी घेवुन येतांना मिळुन आले. सदर गोवंश जातीचे बैल व जर्सी वासरु तसेच पिकअप वाहन यांची अंदाजे किंमत एकुण-11,49,000/-रु. असा मुद्देमाल ताब्यात घेतला. सदरचे वाहन व गोवंश जातीचे बैल व जर्सी वासरु म्हसावद पोलीस ठाण्यात घेवुन येवुन म्हसावद पोलीस ठाणे गुरनं-231/2025 महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 चे सुधारीत अधिनियम 1995 चे कलम 5 (अ) (1), 5(ब), 9 सह प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम 1960 चे कलम 11 (1) (D) (F) व मोटार वाहन कायदा कलम 108 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्ह्याचा पुढील तपास ग्रे. पोसई/विठ्ठल पावरा हे करीत आहे.
सदर कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री. श्रावण दत्त सो, श्री. अपर पोलीस अधिक्षक आशित कांबळे सो, मा. श्री. दत्ता पवार सो, उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा भाग शहादा, यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसावद पोलीस ठाणे नेमणुकीस असलेले सपोनि/नितीन अ. कामे, ग्रे. पोसई/राजेंद्र चव्हाण, असई/नरेंद्र सोनार, पोहेकॉ/1119 दादाभाई साबळे, पोकॉ/330 राकेश पावरा, पोकों/506 उमेश पावरा, पोकों/498 प्रविण पवार, चापोकों/1167 सचिन तावळे यांनी केली आहे.