(बेधडक मी मराठी न्यूज, नंदुरबार)
नंदुरबार शहाराअंतर्गत असलेले आदिवासींचे आराध्य दैवत यामोगी माते मंदिरातील मागील बाजूस सर्वे नंबर 414 येथे मोठी सरकारी भूखंड असून या भूखंडावर जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा सत्र न्यायालय, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, अशी महत्त्वाची कार्यालय या भूखंड वर उभारण्यात आलेले आहेत. या ठिकाणी खाजगी भूमाफियान मार्फत जेसीबी द्वारे तीन ते चार एकर जमिनीवर सपाटी करून महसूल विभागातील काही भ्रष्ट अधिकारी कर्मचारी यांना हाताशी धरून अवैधरित्या सरकारी भूखंड आपल्या नावावर करून सदर जागेवर आपल्या नावाची पाटी लावली आहे. सदर मंदिराच्या मागील बाजूस एअरटेल या कंपनीच्या मोबाईल टावरी अवेद्य रित्या उभारण्यात आला आहे त्याची चौकशी करून जागा मालक व एअर मोबाईल टॉवर कंपनीचे संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्यावर देखील शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे तसेच सदर भूखंड हा सरकारी कामासाठी उपयोगात आणावा, सदर भूमाफीया एवढ्यावरून थांबता यांनी नंदुरबार शहरा लागत असलेल्या आदिवासींच्या शेकडो एकर जमिनी बेकायदेशीर रित्या हडप केलेल्या आहेत आणि सदर जमिनीवर प्लॉट पाडून यांनी विक्री सुद्धा केलेली आहे.
राज्याच्या महसूल कायद्याप्रमाणे आदिवासींच्या जमिनी हस्तांतरणास मनाई हुकूम असताना सुद्धा या जमिनी बिगर आदिवासी व्यक्तींच्या नावावर होताच कशा? यास भूमी अभिलेख व महसूल विभाग देखील तेवढाच जबाबदार आहे यामुळे भूमी अभिलेख व महसूल विभागातील मागील 50 वर्षाच्या आदिवासींच्या जमिनी हस्तांतरणाच्या व्यवहाराची शासनाने सखोल चौकशी करावी व त्या जमिनी सदर बिगर आदिवासी व्यक्तींकडून परत घेऊन त्या आदिवासी शेतकरी मूळ मालकांना परत मिळून देण्याची जबाबदारी देखील शासनाने घ्यावी व शासनाने उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करून त्याची सखोल चौकशी करून चौकशी अंती दोषी आढळणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी असे आशयाचे निवेदन एकलव्य भिल्ल समाज संघटनेतर्फे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
यावेळी श्री विजय आर ठाकरे जिल्हाध्यक्ष नंदुरबार, गणेश सोनवणे, जिल्हासंपर्कप्रमुख जयसिंग पवार, उपजिल्हाध्यक्ष शरद सोनी, जिल्हाकार्याध्यक्ष अर्जुन पवार, प्रवक्ता लहू गायकवाड, तालुकाध्यक्ष व भिल्ल संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.