(बेधडक मी मराठी न्यूज)
शहादा : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि नंदुरबार तालुका विधायक समितीचे गजमल तुळशीराम पाटील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने पहिला टप्प्यातील जिल्हास्तरीय आविष्कार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत शहादा येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाची विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करून महाविद्यालयाचे नावलौकिक करून यश संपादन केले. आविष्कार २०२४ या स्पर्धेत महाविद्यालयातर्फे पोस्टर सादरीकरण पदवी श्रेणीत १९, पदव्युत्तर पदवी श्रेणीत १२ आणि संशोधन विद्यार्थी श्रेणीत ०१ तसेच मॉडेल्स (उपकरण) पदवी श्रेणीत ०३ असे एकूण ६२ स्पर्धकांनी सादर आपले पोस्टर आणि मॉडेल्स (उपकरण) यांचे सादरीकरण केले. त्यातील आविष्कार २०२४ च्या दुसऱ्या टप्प्यातील विद्यापीठ स्तरीय स्पर्धेसाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे महाविद्यालयातील १७ स्पर्धकांची निवड करण्यात आली होती त्यात पोस्टर सादरीकरण पदवी श्रेणीत ०५ स्पर्धक त्यात चौधरी प्राची गणेश, पाटील संस्कृती प्रशांत, पाटील रुचिता श्रीराम, पाटील साक्षी वासुदेव, बिरारी संजूषा संजय, बच्छाव अर्पणा , तसेच मॉडेल्स (उपकरण) मध्ये पाटील वेदांत विकास, पाटील मयूर कैलास तर पदव्युत्तर पदवी श्रेणीत पोस्टर सादरीकरणमध्ये गिरासे अक्षता महेंद्रसिंग, पवार मोहित सुनिल, पटेल सेजल तुकाराम, आणि संशोधन विद्यार्थी श्रेणीत प्रा.अमितधनकानी यांची विद्यापीठस्तरीय आविष्कार स्पर्धेसाठी निवड करण्यात आली होती..
सर्व यशस्वी विद्यार्थी, मार्गदर्शक प्राध्यापक व प्राध्यापकांचे पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री बापूसाहेब दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष श्री जगदीशभाई पाटील, मानद सचिव ताईसाहेब श्रीमती कमलताई पाटील, शैक्षणिक व सामान्य प्रशासन विभागाचे समन्वयक प्रा.मकरंदभाई पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा मंडळाचे संचालक श्री मयूरभाई दीपकभाई पाटील, प्राचार्य डॉ. एस.पी. पवार यांनी सर्व सहभागी आणि निवडलेल्या विद्यार्थी आणि त्यांच्या मार्गदर्शकांचे कौतुक व अभिनंदन केले. विद्यार्थी स्पर्धकांना आविष्कार समिती प्रमुख व समन्वयक प्रा.डॉ. सुनीला पाटील आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी वृंद यांचे मार्गदर्शन लाभले.