नाशिक: श्री खुशाल विनायक कदम व सौ सुलभा खुशाल कदम यांची मुलगी ज्योत्स्ना.यांचे वडील इलेक्ट्रिशन मजूर व आई शिलाई काम करून मुलींच्या शिक्षणाचा ध्यास घेऊन गाव सोडून नाशिकला आले. मुलीचा जन्म शिक्षणही नाशिकमध्ये झाले. जोत्स्ना पहिली ते सातवी पर्यंत पेठे महाविद्यालय उंटवाडी नाशिक या शाळेत केले. शिक्षण घेत असताना आईने अनेक उपक्रमात सहभाग घ्यायला लावत असे मग ती कोणतीही परीक्षा असो किंवा साधा उपक्रम असो त्यात बक्षीस मिळो किंवा न मिळो ती मला नेहमी सांगायची की तू उपक्रमात भाग घेत जा याचा उपयोग तुला पुढे होईल तेव्हा मला त्याचा फायदा कळत नव्हता कधी कधी मुलींची चिडचिड व्हायची.मुलांसारखी बालपण हे कळलं नाही. ती कधीच दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये किंवा उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मामाच्या गावाला किंवा निमगुले गावाला कधी आलेली नाही आई सुट्ट्यांमध्येही तिला अनेक क्लासेस लावून द्यायची तिला खूप राग यायचा की ती इतर मुलांसारखी का मी बालपणीच्या विरगुळा करू शकत नव्हती,फायदा कळायला लागला, सातवीपर्यंत शिक्षणात अनेक अडचणी आल्या पण आई-वडिलांनी मला कधी भासू दिले नाही मी जाहीर उपक्रमात किंवा मला कुठेही जायचं असेल त्यांना मान त्यांनी तिला कधीही नकार दिला नाही तेव्हापासून तिचे स्वप्न होतं की देशासाठी काहीतरी करायचंय त्या गोष्टी तेवढं नॉलेज नव्हतं परंतु फक्त एवढा कळायचं की आपल्या देशासाठी पोलीस आर्मी हे लोक बलिदान देतात त्यांच्या जीवनाचा त्याग देतात आणि जोत्सना तेच करायचे होते. तेव्हा तिला कळले की माझ्या आई-वडिलांना मी एकुलती एक मुलगी खूप लहानपणात तिला समज आली की मुलगा असता तर त्यांनी वडिलांचे नाव मिळवलं असतं जर आता त्यांना मुलगा नाहीये तर त्याचं काम मला करायचंय तिला वडिलांच कमवायचं होतं अनेक जण म्हणायचे मुलगा पाहिजे होता मुलगा पाहिजे होता म्हणून तिने ठरवलं की एक दिवस यांना असं वाटेल की मुलगी पण खूप काही करू शकते म्हणूनच तिने निर्णय घेतला मला इतर मुलींपेक्षा वेगळ काहीतरी करून वडिलांचे नाव कमवायचे आहे.शहरात असूनही त्यांना खूप अडचणींचा सामना करावा लागला कधी कधी तर साधा भात तोही बिना मिठाचा शिजवून खाल्ला आहे परंतु तिला आईचे शिकवण होती आपली परिस्थिती कशीही असो ही दुसऱ्या जवळ रडून सांगायची नाही आणि मी कधीही कुणाला सांगितलं ही नाही तेव्हा मी छोटे-मोठे घरी काम आणायचं करायला जसं की छोटे आकाश कंदील घरी बनवायचे 50 पैशाला एक अशा कामांमध्ये मी आईला नेहमी मदत केली आहे. सातवीत गेल्यानंतर मी वीस रुपये तासाने आईसोबत काम केले शाळा क्लास हे सर्व करून ते काम म्हणजे छोटी छोटी बैल बनवायचे मला आई-वडिलांनी कायम शिकवण दिली की कोणत्याच कामाची लाज बाळगायची नसते म्हणून मी कधीच कोणत्या कामाला लाजली नाही. नंतरचे शिक्षण दहावीपर्यंत तिचे बिटकोगल हायस्कूलमध्ये झाले तिथून खरा माझा प्रवास सुरू झाला. स्वतः जबाबदारी कशी घ्यायची असते ते तिथून कळलं सातवी नंतर तिला खूपच जास्त अडचण येऊ लागल्या अनेक जण आईला म्हणू लागले की तू निमगुले (मोठे) गावाला राहायला जा नाशिकमध्ये शक्य नाही राहण. पण मजोत्सना आई एकाच मतावर ठाम होती की माझ्या मुलीचे शिक्षण मला नाशिकला करायचं आणि खरंतर त्यामुळेच मी आज ही नोकरी मिळू शकली. तेव्हा माझी आई सर्वांच्या नजरेत वाईट झाली असेल पण तिने ती पर्वा केली नाही. ब्लाऊज शिवून अनेक छोटे-मोठे घरी कामं आणून असे माझे शिक्षण पूर्ण केले. नववीला असताना बिटको गर्ल्स हायस्कूल मध्ये आदर्श विद्यार्थीनीचा पुरस्कार मिळाला माझ्या आयुष्यातला पहिला सुवर्णक्षण… WELL BEGUM IS HALF DONE..
प्रमाणे तेथून मला जास्त प्रेरणा मिळाली खरं म्हणतात ना मुलांचे आयुष्य हे शाळेपासूनच सुरू होते तर ते खरं आहे आम्ही छोटे छोटे बैल पण त्या हे विकायचो अनेक छोटे मोठे व्यवसाय आम्ही केले पण दुकान नसल्याकारणाने रस्त्यावर वर बसून विकायचो पण मला त्या गोष्टीची कधीही लाज वाटली नाही. आई-वडिलांनी बाहेरच्या बरोबर मला घरातले ही संस्कार लावलेत शिक्षणाबरोबर मला घरातली ही सगळे काम शिकवले आहेत . आज मला यश नाही आले तर माझ्या आई वडिलांना यश आले आई वडील म्हणून ते कुठेच कमी पडले नाही . बारावीनंतर अनेक जण माझ्या आईच्या मागे लागले की मुलीचे लग्न करून टाक पण तेव्हाही माझी आई निर्णयावर पक्की होती त्यावेळेस आई आणि वडील दोघांनीही माझ्या बाजूने उभे राहिले .पहिले पासून तिच ध्येय तर तेच होतं की मिलिटरी फोर्स मध्ये जायचं पण त्यासाठी कोणती परीक्षा द्यावी लागते हे काही माहित नव्हतं म्हणून मी एक पर्याय ठेवला की अकरावी बारावी कॉमर्समधून केली नंतर मी डिफेन्स फोर्स मध्ये कसे जाता येईल याची माहिती जमवली तर त्यात मला असं निदर्शनास आलं की एनसीसी चा फायदा होतो एनसीसी काय असतो हे तेव्हा काही मला माहित नव्हतं परंतु घ्यायचं हे निश्चित होत पहिल्या वर्षाला कर्मवीर शांताराम बापू वावरे महाविद्यालय उत्तम नगर नाशिक या कॉलेजमध्ये प्रवेश घेतलं तिथे एनसीसी मध्ये ही सहभाग करून घेतला..हळूहळू तिथून प्रवास सुरू झाला तिथून मला जास्त वेळ लागला त्या मिलिटरी फोर्स कशी असते आणि ते काय काम करतात यात..कॉलेज सोबत एनसीसी मध्ये तीन वर्ष मी प्रॅक्टिस करत होते… अडीअडचणी तून मार्ग काढत….प्रतिकूल परिस्तिथी वर मात करीत मी तीन वर्षात जिद्दीने मेहनत करत अनेक उपक्रम व कॅम्पमध्ये भाग घेतला तसेच एनसीसी मधून माझा फायरिंगलाही सिलेक्शन झालं होतं,याच पूर्ण कालावधीमध्ये माझ्या कॉलेजच्या सर्व शिक्षकांनी प्राध्यापकांनी प्राचार्य मॅडम यांनी खूप मार्गदर्शन व सहकार्य केले.. एनसीसी पूर्ण झाल्यानंतर मी एनएसएस मध्ये प्रवेश घेतला, एनएसएस मध्ये प्रवेश घेतला असतानाच मला ती आवड होती समाजकार्याची. एनएसएस चा अर्थच असतो समाजकार्य छोटे मोठे उपक्रमांनी नेहमीच राबवत असतो, त्यात एक एनएसएस मधून संधी मिळाली ती म्हणजे रिपब्लिक डे परेड ला जाण्याची ती मिळालेली संधी न गमावता मी त्यासाठी मी त्या स्पर्धेत सहभाग घेतला, प्रथम कॉलेजमधून निवड झाली नंतर जिल्ह्यात ही निवड झाली . असे टप्पे पार करत माझं फायनल सिलेक्शन झालं ते दिल्लीसाठी.. सन 2020 मध्ये डिसेंबर महिन्यात निकाल लागला.. एक महिना दिल्लीत जायचं खूप उत्सुकता होती..
तेव्हाच अनेक ठिकाणी माझं कौतुक करण्यात आलं, मला तो आनंद होताच.. पण त्या पलीकडे आनंद जो होता तो म्हणजे माझ्या आई-वडिलांच्या डोळ्यातला आनंदाचा..कारण एवढ्या मुलांमधून माझी निवड होऊन मी तिथे गेलेली होती आणि तेही माझं एक लहानपणीचे स्वप्न होतं की दिल्लीच्या राजपथवर परेड करायचे…
दिल्लीला गेले असताना एक महिना आमची ट्रेनिंग चालली राजपथ वर जेव्हा ड्रिल करायला फर्स्ट दिले गेले तेंव्हा जणू काही असं वाटलं की स्वर्गच पाहिला… तिथे गेल्यानंतर अजून प्रोत्साहन मिळालं..माझे पूर्ण ग्रॅज्युएशन मध्ये मी अभ्यास ही त्याच ताकदीने चालू ठेवला होता
पण आरडी परेड करून आल्यानंतर पूर्णपणे अभ्यास आणि फिजिकल प्रॅक्टिस साठी तयार झाली..
कधी कधी तर ग्राउंड वर जाण्यासाठी रिक्षाला किंवा बसला पैसेही नसायचे पायी जाऊन पायी यायची..तयारी तर सतत चालूच होती, माझ्या आयुष्यातली ही माझी पहिली सीमा सुरक्षा दल म्हणजे BSF भरती होती आणि आई वडिलांनी शिकवण दिलेली होती की..
अपयश ही यशाची पहिली पायरी असते… म्हणून मी मनाची तयारी केलेली होती जरी अपयश आले तरी खचायचं नाही परंतु देवाच्या कृपेने आणि आई-वडिलांच्या आशीर्वादाने मला पहिल्याच BSF च्या भरतीत यश आले. हे स्वप्न माझं तर होतंच पण ते आधी आई-वडिलांनी पाहिलं होतं म्हणून ते मला पूर्ण करायचं होतं आणि ते मी पूर्ण केलं..सोपं नाहीये एकुलत्या एक मुलीला BSF मध्ये सीमेवर पाठवणं…
पण मी जाणार आणि
देश सेवा करणार…
लहरों से डरकर नौका पार नहीं होती…
कोशिश करने वालों की कभी हार नही होती..
कुछ किये बिना जयजयकार नहीं होती…
कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती..
या हरिवंश राय बच्चन यांच्या कवितेप्रमाणे
मी प्रयत्न सोडले नाही…
आणि
मी सीमेवर माझे कौशल्य कर्तृत्व पणाला लावणार…
देशासाठी लढणार…
आई वडिलांचे…
गावाचे..
नाशिकचे नाव मोठे करणार…
-BSF सैनिक ज्योत्सना सुलभा खुशाल कदम