( बेधडक मी मराठी न्यूज )
धुळे प्रतिनिधी दिलीप साळुंखे(नेर) : अक्कलपाडा धरणाच्या पांझरा नदीवरील शिवकालीन फड पाट रायवट पाट जुने,नवे भदाणे,नेर,लोंढा या भागातील सर्व पाट जीर्ण झाले असून पाट,चाऱ्या,मोऱ्या धरण आणि पांझरा नदीत पाणी असुनही शेतीला पाणी देता येत नाही. त्यामुळे सर्वत्र नादुरुस्त झालेल्या पाट चाऱ्या असून त्या त्वरित दुरुस्तीचे सर्वेक्षण होऊन परीपूर्ण पणे अंदाजपत्रक तयार करण्यात यावे अशी मागणीचे निवेदन पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियता नागेश वट्टे, ऊपअभियंता पी. के. मेंढे यांना नेरचे माजी सरपंच व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव खलाणे सामाजिक कार्यकर्ते वसंत बोरसे व गावकऱ्यांनी दि.२३/१२/२४ रोजी निवेदन दिले होते. त्यानुसार आमदार राम भदाणे यांनी पाटबंधारे विभागाला त्वरित सर्वेक्षण करून अंदाजपत्रक तयार करण्यात यावे अशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार दिनांक २/१/२०२५ रोजी पाटबंधारे विभागाच्या शाखा अभियंता राहुल नेवसे, निवृत्त अभियंता डी. आर. पाटील, दिनेश बोरसे, राकेश अहिरे, भुषण पाटील यांनी प्रत्यक्ष येऊन सर्वेक्षन केलेयावेळी नेरचे चे माजी सरपंच व भाजपा जिल्हा उपअध्यक्ष शंकरराव खलाणे, नानाभाऊ बोढरे, आर. डी. माळी, वसंत बोरसे,छोटू जगताप, भदाण्याचे श्रीकांत खलाणे, विलास खलाणे, उपसरपंच विठ्ठल पाटील, दीपक पाटील, कांतीलाल भिल, विक्रम पाटील, शरद पाटील, भवेंद्र खलाणे, आदी पद्यधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.
सर्व पाटचाऱ्या पूर्णपणे नादुरुस्त असून भदाणे गावामध्ये पाटामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी व शेवाळ साचले असून गावात रोगराई पसरल्याचे भीती असल्याने ग्रामस्थ त्वरित कामे व्हावी अशी मागणी केली आहे. त्वरित सर्वक्षण सुरू झाल्याने गावामध्ये समाधान व्यक्त होत आहे.