खंडलाय बु येथे अमरधाम शेड व बैठक व्यवस्थाचे जि.प.सदस्य आनंदराव पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन

(बेधड़क मी मराठी न्यूज़)

नेर (धुळे प्रतिनिधी दिलीप साळुंखे): धुळे तालुक्यातील खंडलाय बु येथे धुळे ग्रामीणचे लाडके मा.आमदार आदरणीय कुणालबाबा पाटील यांच्या आदेशान्वये,नेर जिल्हा परिषद गटातील सदस्य श्री आनंदराव पाटील यांच्या प्रयत्नाने तसेच ग्रामपंचायत खंडलाय बु.गटप्रमुख आबा पगारे सरपंच,उपसरपंच,सदस्य यांच्या सुचकतेने अमरधाम शेड आणि बैठक व्यवस्थाचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण झाल्यापासून ते आज पर्यंत खंडलाय बु.गावासाठी अमरधाम नव्हतेच तर गावातील कर्मभूमीत अंतिम श्वास घेतलेल्या माणसाच्या अंत्यविधीसाठी शेजारील गावातून जाऊन अंतिम अंत्यसंस्कार करण्यात येत होते,विशेष बाब म्हणजे पावसाळ्यात जर मुख्य रस्त्यावरील पुलावरून पाणी जात असेल अशा परिस्थितीत अंत्यसंस्कार कुठे करावा असा प्रश्न संपूर्ण ग्रामस्थांना पडत असे,परंतु मा.आमदार कुणालबाबा पाटील आणि जि प सदस्य आनंदराव पाटील यांनी दिलेला शब्द 100% पार पाडला आणि तो सत्यात देखील उतरवला म्हणून संपूर्ण ग्रामस्थांना तर्फे त्यांचं मनस्वी आभार आणि अभिनंदन करण्यात आलं.आणि पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा देखील देण्यात आल्या.

त्याबद्दल समस्त ग्रामस्थ व पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये कौतुकाचे व उत्सुकतेचे वातावरण आनंद पाटील यांच्याबाबतीत निर्माण झालेला आहे.तरी याबाबत ग्रामपंचायत गटप्रमुख सरपंच, उपसरपंच, सदस्य या सर्वांनी आभार देखील मानले.या कार्यक्रमाच्या भूमिपूजनाच्याप्रसंगी श्री विठ्ठल भिला माळी (मा.उपसरपंच),श्री भीमराव खंडू पाटील (प्रगतशील शेतकरी),श्री दौलत चिंधा माळी (प्रगतशील शेतकरी)श्री दादाभाऊ कोळी (जि प शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष), योगेश देशमुख (श्रीराम मित्र मंडळ अध्यक्ष),रजनीकांत माळी,अनिल एंडाईत, मुकेश बागुल,इंजीनियर हितेश देवरे.आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *