(बेधडक मी मराठी न्यूज )
धुळे : धुळे जिल्ह्यातील शिरपूर व सोनगीर टोल नाक्यावरील व्यवस्थापनाने कामगार संघटनेला पूर्व सूचना न देता तसेच कामगारांना विश्वासात न घेता परस्पर पगारवाढ केल्याने महाराष्ट्र नवनीर्माण सेनेच्या सभासद कामगारांनी संताप व्यक्त केला असुन या माध्यमातून व्यवस्थापन कामगारांची फसवणूक करत असल्याचा आरोप करत व्यवस्थापनाच्या विरोधात प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कामगार सभासदांनी व्यवस्थापनाला आंदोलनाचा इशारा दिला असून या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सरचिटणीस गजानन नारायण राणे यांच्यासोबत चर्चा करून पुढील दिशा ठरविणार असल्याचे पदाधिकारी यांनी सांगितले आहे.