– बेडधक मी मराठी न्यूज
शहादा, : मलोणी (ता.शहादा) येथील विवाहिता दिपाली चित्ते हिच्या हत्तेप्रकरणी खासदार गोवाल पाडवी यांनी कुटुंबीयांची घरी जाऊन भेट घेतली व सांत्वन केले. यावेळी आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
मलोणी येथील दिपाली चित्ते हिच्यावर किरकोळ वादातून चाकू हल्ला करण्यात आला होता. सुरत येथे उपचार सुरू असताना तिची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी दोषींना कठोर शिक्षा करण्यात यावी या मागणीसाठी शहरासह तालुक्यात विविध ठिकाणी बंद पाळला जात आहे. खासदार गोवाल पाडवी यांनी मलोणी येथे जाऊन पती सागर चित्ते व कुटुंबीयांची भेट घेतली आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे कुटुंबीयांना सांगत सांत्वन केले. यावेळी मयत दिपाली चित्ते हिचे पती सागर चित्ते यांच्याकडे आर्थिक मदत देण्यात आली. यावेळी श्री पाडवी यांच्या समवेत शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजीत पाटील, शहादा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश नाईक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आदी उपस्थित होते.
फोटो ओळ —
मलोणी (ता. शहादा): मयत दिपाली चित्ते हिच्या कुटुंबीयांचे सांत्वन करताना खासदार गोवाल पाडवी, अभिजित पाटील, डॉ. सुरेश नाईक आदी.