-बेधड़क मी मराठी न्यूज़
धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे
नेर-: धुळे तालुक्यातील नेर येथील पैलवानांनी शिरपूर केसरी किताब मिळवलेल्या पैलवानांचा नेर ग्रामस्थांकडून सत्कार करण्यात आला आहे.तसेच शिरपूर येथे झालेल्या भव्य कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. तेथे जिल्हाभरातून अनेक गावांमधून मल्लआले होते. 75 वजन गटातील झालेल्या शिरपूर केसरी या लक्षवेधी झालेल्या कुस्ती स्पर्धेत नेरचा चि.रोहित अरुण कोळी हा विजेता ठरला. त्याला आमदार काशिनाथ पावरा यांच्या हस्ते शिरपूर केसरी हा किताब गदा, मेडल व बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला.तर 45 वजन वयोगटात चि. हंसराज योगेश कोळी विजेता ठरला. त्याचाही गदा, मेडल व बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला.
यामुळे या विजेतांचा ग्रामस्यांकडून सत्कार करण्यात आला. यावेळी नेरचे माजी सरपंच व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव खलाणे माजी ग्रा.पं.सदस्य नामदेव माळी, ग्रामपंचायत सदस्य सुनील भागवत, भाजपा तालुका पदाधिकारी उमेश जयस्वाल, माजी प.स.सदस् वसंत देशमुख,वसंत सोनवणे, आर.डी.माळी,संतोष ईशी, रावसाहेब खलाणे,दिपक खलाणे, सुरेश सोनवणे,साहेबराव गवळे, रतिलाल पाटील,अनंत वाडीले,वसंत बोरसे,ललित गुरव,बापूजी बाविस्कर,दीपक मोरे, दिलीप साळुंखे,सुनील कोळी,रवींद्र साळवे,स्वानंद जोशी,बापू जमदाळे विनोद कोळी,शांताराम पाटील,दादा कोळी,छोटू कोळी आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.