शेतकऱ्यांना मिळणार आता फार्मर आयडी कार्ड

-बेधडक मी मराठी न्यूज
तळोदा प्रतिनिधी- हेमंत मराठे मो -९६८९८४०८५५

तळोदा : शासनाच्या ॲग्री स्टॉक योजनेअंतर्गत सर्व शेतकरी बांधवांना आपला सातबारा आधारला लिंक करणे कामी प्रत्येक गावातील तसेच तालुक्यामधील सर्व संबंधित तलाठी यांनी याविषयी शिबिर घेऊन जनजागृती केली आहे .या फार्मर आयडी कार्ड विषयी शेतकऱ्यांना तलाठी मार्फत समजून सांगण्यात आले या कार्डमुळे शेतकऱ्यांना कोणते फायदे व लाभ होईल याची कल्पना देण्यात येत आहे.
ॲग्री स्टॉक म्हणजे काय?

ॲग्री स्टॉक ही शेतीशी संबंधित सर्व घटकांना शेतकरी ग्राहक विक्रेते आणि सरकार यांना एकत्र आणणारी एक क्रांतिकारक प्रणाली आहे यामधून शेतकऱ्याची ओळख फार्मर आयडी निश्चित केली जाते आणि शेतीच्या सर्व प्रक्रियांमध्ये अचूकता आणि पारदर्शकता आणली जाते.
फार्मर आयडी म्हणजे काय?

फार्मर आयडी हा शेतकऱ्यांसाठी अदितीय ओळख क्रमांक आहे तो ऍग्री स्टॉक अंतर्गत तयार केला जातो ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या आधार क्रमांक जमिनीच्या सातबारा ही माहिती समाविष्ट असते.
फार्मर आयडी ची आवश्यकता का आहे?

यामध्ये प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत थेट लाभ हा हस्तांतरणासाठी होणार आहे तसेच पीक विमा आणि नुकसान भरपाई अचूक नोंद होण्यास मदत होते व डिजिटल पीक कर्ज अंतर्गत जलद कर्जे वितरणास मदत होत असते त्याचप्रमाणे हवामानाची अचुक ,माहिती मृदा आरोग्य तपशील आणि योग्य पीक विषयी सल्ला मिळतो. त्याचप्रमाणे पीक पेरणी व उत्पादनासाठी अचूक मार्गदर्शन मिळते यामुळे पारदर्शक प्रक्रियेतून सरकारी योजनांच्या लाभ सुरळीत होतो. पीक कर्ज एमएसपी आणि इतर योजनांमध्ये अडथळे येत नाही.
अशा विविध शासकीय कृषी विषयक योजनांची माहिती ही शेतकऱ्यांना फार्मर आयडीवरून मिळू शकते .त्यासाठी तळोदा तहसीलदार सो दीपक धिवरे तसेच मंडळ अधिकारी तुषार साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्व तलाठीकडून शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यात येत आहे .या फार्मर आयडी साठी लागणारे कागदपत्र आधार कार्ड, आधार लिंक मोबाइल क्रमांक व सर्व सात बारा उतारे घेऊन आपल्या नजिकच्या सीएससी सेंटरवर जाऊन फार्मर आयडी चे नोंदणी करणे अत्यावश्यक आहे. या कामीऑनलाईन प्रक्रिया करताना वेबसाईट दिवसा लोड घेते म्हणून म. तहसीलदार सो तळोदा यांनी तालुक्यातील सर्व आपले सरकार सुविधा केंद्र सीएससी सेंटर चालकांना दररोज रात्री दहा वाजेपर्यंत आपले सेंटर चालू ठेवण्यात यावे. व एकही शेतकरी या फार्मर आयडी पासून वंचित राहता कामा नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *