बेधडक मी मराठी न्यूज
तळोदा तालुका प्रतिनिधि -हेमंत मराठे मो नो ९६८९८४०८५५
-
तळोदा : शहरातील नेमसुशिल शैक्षणिक समूहात मातृ पितृ पूजन दिवस साजरा करण्यात आला प्रसंगी पाल्यांनी आपल्या आई वडिलांचे औक्षण करून कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी समूहातून पालक मान्यवर दिनेश मगरे लक्ष्मीकांत बोरसे गिरीश मगरे महेंद्रभाई पाटील राजेंद्र भाई पाटील देवेंद्र गोसावी परेश सोनार विक्रांत पाटील राजेश पाटील अनिल पाटील भालचंद्र चौधरी निलेश चिंचोले आदी पालकांना आमंत्रित करण्यात आले होते
मातृ पितृ पूजन कार्यक्रम प्रसंगी मुख्याध्यापक सुनिल परदेशी यांनी आपल्या मनोगतातून आई वडिल गुरू आपले आद्य दैवत असून त्यांचं महत्व बद्दल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे मुख्या. श्रीमती पुष्पा बागुल प्राचार्य सुनिल परदेशी प्रिन्सिपल सुनिल परदेशी मुख्या. श्रीमती भावना डोंगरे मुख्या. गणेश बेलेकर उप प्राचार्या कल्याणी वडाळकर होते.
स्तुत्य उपक्रमाबद्दल संस्थाध्यक्ष निखिलभाई तुरखीया संचालिका सोनाभाभी तुरखीया उपाध्यक्ष डी एम महाले सचिव संजयभाई पटेल समनव्यक हर्षिलभाई तुरखीया यांनी कौतुक केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यामंदिरातील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.
सूत्रसंचालन अश्विनी भोपे यांनी तर आभार सागर मराठे यांनी मानले.