रांजणी कृषी विद्यालयात विद्यार्थ्यांना बटाटे वेफर्स व श्रीखंड बनवणे विषयी मार्गदर्शन

बेधडक मी मराठी न्यूज (तळोदा तालुका प्रतिनिधी- हेमंत मराठे) मो. नंबर 9689840855

  • तळोदा: तालुक्यातील रांजणी येथील शेठ राणूलाल फुलचंद जैन कृषी तंत्र विद्यालयात विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या विशेष भाग म्हणून प्राचार्य प्रफुल्ल पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली विषय शिक्षिका संगीता वसावे यांनी विद्यार्थ्यांना बटाट्यापासून वेफर्स व श्रीखंड कशाप्रकारे तयार करता येते यावर सखोल मार्गदर्शन करून प्रत्यक्षरीत्या बनवून दाखवले. त्यात प्रामुख्याने प्रथमतः बटाटे वेफर्स बनवण्यासाठी मध्यम गोल आकाराचे ताजे पांढरे बटाटे घ्यावेत. बटाट्यात कमीत कमी मुक्त साखरेचे प्रमाण असल्यास उत्तम प्रकारे वेफर्स तयार करता येतात .बटाटे प्रथमता स्वच्छ धुऊन यंत्राच्या सहाय्याने त्यावरील साल काढून हात मशीन किंवा चिप्स यंत्राच्या वापर करून साधारण एक मिलिमीटर जाडीचे काप करून हे काप पाच टक्के मिठाच्या द्रावणात साठवावे तळायला घेत असताना पाच टक्के मीठ आणि 0.25 टक्के कॅल्शियम क्लोराइड किंवा तुरटीच्या मिश्रण द्रावणामध्ये कमीत कमी 20 ते 30 मिनिटे भिजवून ठेवावेत. तळून काढल्यावर वेफर्स वरती मिठाच्या पाण्याच्या शिडकाव केल्यास उत्तम प्रतीचे कुरकुरीत वेफर्स तयार होतात. तसेच वेगवेगळ्या उत्तम प्रतीच्या मसाल्यांच्या मिश्रणाचे द्रावण काढून फवारल्यास उत्तम प्रतीचे चविष्ट वेफर्स तयार करता येतात. असे वेफर्स तडुन थंड झाल्यावर प्लास्टिकच्या पिशव्यात बाजारात मागणीच्या हिशोबाने पॅकिंग करतेवेळी साधारण 15 ते 20 दिवस वेफर्स ताजे तवाने राहावेत म्हणून नत्र वायू भरून पिशव्या हवा बंद केल्यास वेफर्स एक ते दीड महिन्यापर्यंत उत्तम प्रतीचे राहतात.
    त्याचप्रमाणे श्रीखंड हा देखील बहुतांश लोकांना खूप आवडणारा आंबट गोड पदार्थ म्हणून ओळखला जाणारा द्रव्य म्हणून श्रीखंड यांच्याकडे पाहिले जाते. श्रीखंड हा आंबट गोड प्रकारच्या दुग्धजन्य पदार्थ आहे. दुधापासून दही तयार करून दह्यापासून श्रीखंड तयार करतात. तयार झालेले दही सछिद्र कापडामध्ये लटकवून ठेवल्यास दह्यांमधील निकामी पाणी सगळे निघून जाण्यास मदत होते. संपूर्ण पाणी निघून गेल्यावर कापडामध्ये स्वच्छ शुभ्र पांढरा घनपदार्थ राहतो त्यास चक्का असे म्हणतात. त्याच्या चवीनुसार आवश्यक तेवढी साखर मिसळून एक जीव मिश्रण तयार करण्यात येते. त्यात श्रीखंड असे म्हणतात. श्रीखंडाला जास्तीची चव यावी म्हणून त्याच्यात वेलची, केसर, पिस्ता ,चेरी ,किसमिस, असे घटक मिसळून एक उत्तम प्रकारच्या श्रीखंड हा चविष्ट पदार्थ तयार होतो. श्रीखंड तयार झाल्यानंतर त्यास थोडी उष्णता देऊन पाण्याचे प्रमाण कमी केले जाते .त्यापासून श्रीखंड वडी ही मिठाई बनवली जाते.याविषयी वेफर्स व श्रीखंड कृतीतून करून दाखवीत विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी प्राचार्य प्रफुल्ल पटेल, प्राध्यापक प्रवीण वसावे, प्राध्यापक शरद साठे, प्राध्यापक भिकन पाटील, प्राध्यापक जिजाबराव पवार ,प्राध्यापक राजेश पाडवी, प्राध्यापिका संगीता वसावे शाळेचे वरिष्ठ लिपिक दीपक मराठे, जितेंद्र वानखेडे तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *