ग्रामपंचायत रांजणी येथे लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामीण टप्पा दोनच्या लाभार्थ्यांना आदेश वाटप

  • बेधडक मी मराठी न्यूज- तळोदा तालुका प्रतिनिधी- हेमंत मराठे मोबाईल नंबर 9689840855
    तळोदा:- तालुक्यातील रांजणी येथे आज दिनांक 22/02/2025 रोजी गावातील मंजूर लाभार्थ्यांना घरकुल आदेश वाटप व पहिला धनादेशाच्या हप्ता वितरित करण्याच्या कार्यक्रम सरपंच अजय विजय ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सभेची सुरुवात झाली. केंद्रीय गृहमंत्री माननीय नामदार अमितजी शहा साहेब भारत सरकार यांच्या शुभहस्ते व मा. ना. देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत वीस लक्ष लाभार्थ्यांना घरकुलांचे मंजुरी पत्र व दशलक्ष लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरणाच्या ग्रोथ्सवाच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने ग्रामपंचायत राजनी येथे सभेला
    सुरवात झाली. सरपंच अजय ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायतअधिकारी मुकेश कापुरे यांनी अगोदर एकूण घरकुल यादीत एकूण 298 लाभार्थ्यांची नावे होती. त्यापैकी एकूण 253 लाभार्थ्यांना मंजुरी आदेश वितरित करून घरकुल बांधकाम कशा पद्धतीने करावयाचे व धनादेशाच्या हप्ता कशाप्रकारे वितरित करण्यात येईल. याची सविस्तर माहिती दिली. घरकुलाचे बांधकाम करण्यासाठी घरकुल बांधकामाच्या टप्प्याने हे चार हप्त्यांमध्ये रुपये 1,20000 अनुदान थेट आपल्या बँक खात्यामध्ये डीबीटी द्वारे प्राप्त होईल. या व्यतिरिक्त मगाराग्रा रोहयो व स्वच्छ भारत मिशनचे अनुदान देखील मिळेल. त्याच्यात पहिला हप्ता हा अनुक्रमे- 15000 मंजुरी, दुसरा हप्ता जोता पातळी 70000, तिसरा हप्ता छज्या पातळी 30000 व चौथा हप्ता घरकुल पूर्ण करतेवेळी 5000 असे एकूण चार हपता मिळून 1,20000रुपये त्याचप्रमाणे मागाराग्रा रोहयो अंतर्गत 90 मनुष्य दिन याच्या मोबदला 26730 व स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय 12000 मिळून एकूण 1,58730रुपये लाभार्थ्याला मिळतील. एवढ्या रकमेत संपूर्ण घरकुलाचे बांधकाम 25 चौरस मीटर चटई क्षेत्रफळांमध्ये विहित वेळेत घरकुल पूर्ण करणे बंधनकारक आहे. तसेच घरकुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर सदर घरकुलाची नोंद ग्रामपंचायतीकडे कुटुंबातील महिलेच्या अगर पती-पत्नीच्या संयुक्त नावे करणे अनिवार्य राहील. यापुढे जाऊन ग्रामपंचायत अधिकाऱ्याने सांगितले की घरावर कॉन्क्रीट स्लॅब ऐवजी पत्रे किंवा कौलारू छत असेल तरी चालेल. जे लाभार्थी वंचित आहेत त्यांनी ताबडतोब कागदपत्रे जमा करावीत. व लाभापासून वंचित न राहावे .तसेच ज्या लाभार्थ्यांचे घरकुल मंजूर आहे व बांधकामासाठी जागा नाही अशा व्यक्ती लाभार्थींनी जागेसाठी अर्ज करावेत त्यांना जागा उपलब्ध करून त्या जागेच्या मोबदला शासन करणार आहे. अशी शाश्वती दिली. व जे काही वंचित लोक आहेत की ज्यांच्याकडे जागा देखील नाही व घरकुल मंजूर नाही अशा लोकांची नवीन यादी तयार करण्यात येईल. व त्यांना लवकरात लवकर घरकुलाच्या लाभ देण्यात येईल. असा ठाम निर्णय दिला. या निर्णयाचे सर्व ग्रामस्थांनी स्वागत केले. कार्यक्रमात आदेश वितरित करून झाल्यावर लाभार्थ्यांच्या खात्यावर घरकुलाच्या पहिला हप्ता टाकण्यात आला. व यात लाभार्थ्यांचे आनंद गगनात मावत नव्हता.व आपल्याला हक्काच्या पक्क्या घरात राहता येईल याची खुशी चेहऱ्यावर दिसून येत होती. व लाभार्थ्यांनी प्रशासनाच्या जाहीर आभार मानत समाधान व्यक्त केले. पुणे येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे पार पडत असलेला मा. ना. केंद्रीय गृहमंत्री अमितजी शहा साहेब यांचे व मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्र फडवणीस तसेच उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजित दादा पवार व उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेब यांचे जिवंत प्रक्षेपण लाभार्थ्यांनी ऐकले. कार्यक्रमात उपसरपंच शरद निंबा मराठे सदस्य धनराज दगा कदम ग्रामपंचायत सदस्या नम्रता धनराज भवर, योगिता दीपक मोरे अंगणवाडी सेविका अश्विनी पुष्पेन्द्र भारती,सविता मोरे ,ग्रामपंचायत ऑपरेटर अभिमन्यू चव्हाण, शिपाई केशव पाडवी, बुधा ठाकरे लाभार्थींपैकी किशोर राजपूत, देविदास कदम, भास्कर गवळी ,काशिनाथ नवाडे, महेश जगदाले, शिवराम पाचोरे,योगेश पाचोरे, देवराम कोक, शाम कोक,प्रवीण मळवी, विद्यासागर कोक, आदी लाभार्थी उपस्थित होते .कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ग्रामपंचायत ऑपरेटर अभिमन्यू चव्हाण सामाजिक कार्यकर्ते सिद्धेश्वर गायकवाड शिपाई केशव पाडवी ,बुधा ठाकरे यांनी मोलाचे परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे शेवटी आभार व समारोप उपसरपंच शरद मराठे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *