बेधडक मी मराठी न्यूज ,
तळोदा तालुका प्रतिनिधी हेमंत मराठे
मो न 9689840855
तळोदा : कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तळोदा, येथे 24 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे मरणोत्तर नेत्रदान विषयी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रा. पंकज सोनवणे अध्यक्ष होते. त्यांनी आपल्या मनोगतामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथी निमित्त “रक्तदान” व “मरणोत्तर नेत्रदान” या संकल्पना राबवल्या जात असल्याचे विद्यार्थ्यांसमोर स्पष्ट केले. नेत्रदान केल्यानंतर आपल्या मरणानंतर ही कुणीतरी परत हे सुंदर जग पाहू शकतो याविषयी विद्यार्थ्यांना सांगितले.
राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. पराग तट्टे यांनी विद्यार्थ्यांकडून मरणोत्तर नेत्रदान करायचे फॉर्म भरून घेतले. व उद्या मंगळवार दि.25 फेब्रुवारीला रक्तदान शिबिरराजचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले आहे व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने रक्तदान करावे असे आव्हान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हेमंत दलाल यांच्या वतीने केले.