छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळा बसविण्यासाठी सकल मराठा समाजाकडूनआमदार राजेश पाडवी यांना निवेदन

बेधडक मी मराठी न्यूज

तळोदा तालुका प्रतिनिधी हेमंत मराठे
मो.नो 9689840855

तळोदा: शिवरात्रीचा शुभ मुहूर्तावर नंदुरबार व धुळे जि. मराठा समाज सार्वजनिक उन्नती मंडळ नंदुरबार व तळोदा तालुक्यातील सकल मराठा समाजाचा वतीने तळोदा शहरात राजपथ वळण रस्त्याजवळ महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वरुढ पुतळा बसविण्यासाठी शहादा – तळोदा मतदारसंघाचे आमदार मा. राजेशदादा पाडवी यानां निवेदन देण्यात आले. व त्यांच्या मंडळा कडून शाल, गुच्छ व शिवाजी महाराजांच्या फोटो फ्रेंम देवून सन्मान करण्यात आला. निवेदन स्वीकारताना मा. आमदार राजेशदादा पाडवी व निवेदन देताना उन्नती मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग आप्पा मराठे, उपाध्यक्ष शांतीलाल नाना गायकवाड, पुरूषोत्तमभाऊ चव्हाण, सचिव अनिल वायकर सर, जेष्ठ संचालक भगवानराव मोगल, संचालक जितेंद्रभाऊ खांडवे, संचालक प्रल्हाद आप्पा फोके, संचालक नवनितभाऊ शिंदे, संचालक महेंद्रभाऊ गाढे, संचालक चुडामणभाऊ मराठे, संचालक शिरीषभाऊ जगदाळे,संचालक शामकांतभाऊ सोमवंशी,तळोदा परिसरातून आनंदा चौधरी, संजय चव्हाण, हंबीरराव चव्हाण, देवकृष्ण चव्हाण, अभिमन्यु भवर, हिरालाल मराठे, गणेशभाऊ मराठे, योगेशभाऊ मराठे, ताराचंद शिंदे, सुधीरभाऊ शिंदे, शांताराम गायकवाड, शंकर नवले, अशोक चव्हाण, अनिल शिंदे, राजू गाढे, दिनेश फोके, विरेंद्र साळुंखे, बंडू साळुंखे, गणेश गायकवाड.तसेच मोठ्या संख्येने समाज बांधवांना उपस्थित होते.प्रास्ताविक गोरे आप्पा यांनी केले. नवनितभाऊ शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच शेवटी आभार अनिल वायकर सर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *