बेधडक मी मराठी न्यूज
तालुका प्रतिनिधी हेमंत मराठे
मो.न.9689840855
तळोदा: येथील मौजे राणीपूर येथील कैलासवासी गोराबाई रावजी वसावे यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त त्यांची मुले किशोर वसावे महाराष्ट्र पोलीस व प्राथमिक शिक्षक प्रवीण वसावे, व भूषण वसावे यांनी आपल्या आईच्या आठवणींना उजाळा देत रानीपुर व पाडळपूर या जिल्हा परिषद मराठी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य वाटप केले.
सविस्तर वृत्त असे की राणीपूर येथील किशोर वसावे हे आपले महाराष्ट्र पोलिसात कर्तव्य बजावत आहेत व त्यांचे बंधू प्राथमिक शिक्षक असून ज्ञानदानाचे कार्य करत आहे. तसेच भाऊ भूषण वसावे यांनी आपल्या आईच्या स्मृतीदिनानिमित्त असे ठरविले की आपण ज्याप्रमाणे शिक्षण घेऊन आज चांगल्या पदावर कार्यरत आहोत .त्याचप्रमाणे आपण समाजाचे काही देणे लागतो. म्हणून त्यांनी आगळावेगळा निर्णय घेऊन जिल्हा परिषद मराठी शाळा राणीपूर तालुका तळोदा येथील सत्तर विद्यार्थ्यांना व पाडळपुर येथील 96 विद्यार्थ्यांना पॅड चित्रकला वही,रंगीत खडू पेन्सिल, खोड रबर, पेन,शार्पनर अशा अभ्यासात लागणाऱ्या शैक्षणिक साहित्याचे वाटप माजी सरपंच कौशल्याताई वसावे मानसी वसावे व प्रियंका वसावे यांच्या हस्ते जमलेल्या सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले त्यावेळी किशोर वसावे यांनी आपले मनोगत व्यक्त करत सांगितले की, मातृभाषेतून खऱ्या अर्थाने चांगले शिक्षण मिळू शकते. तसेच विद्यार्थ्यांना ज्ञानाचे चांगले आकलन मातृभाषेतूनच होते. यासाठी मराठी माध्यमांच्या शाळा टिकाव्यात म्हणून समाजातील प्रत्येक व्यक्तीने याला शक्य होईल त्यांनी अशा गरीब होतकरु विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाचे वस्तु भेट दिल्यास मुलांमध्ये अभ्यास करण्याची रुची वाढते. तसेच माजी सरपंच कौशल्याताई वसावे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की शिक्षण आणि मुले शिक्षणामुळे मनुष्याचे विचार शुद्ध होतात. व आचारन देखील शुद्ध होते. शिक्षणामुळे समाजात उच्च स्थान भेटत असते. अशी मूलभूत सूत्र सांगितले. कार्यक्रमात गावातील बरेच ग्रामस्थ बंधू भगिनी व विद्यार्थी उपस्थित होते. शेवटी मुख्याध्यापिका सीमा बन्सीलाल बागुल यांनी भेट साहित्य बाबत संबंधित करीत म्हटले की असे दाते जर मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना साहित्य भेट म्हणून देतील तर कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही व मुलांमध्ये अभ्यासाची गोळी निर्माण होईल. कार्यक्रमाची प्रस्तावना नंदकुमार शेंद्रे यांनी केली तसेच विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून कुमारी धनश्री वळवी व नशीब वळवी यांनी दात्यांचे आभार मानले.