नाशिक: गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. श्री. जगवेंद्रसिंग राजपूत यांचे कुशल कार्य, सिंघम कार्यशैली, मानवता की मिसाल त्यांचे कार्य कौतुकास्पद असल्याने मानवाधिकार न्याय सुरक्षा परिषद महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष युवराजसिंग राजपूत यांनी सर्व क्षेत्रातील अधिकारी , कर्मचाऱ्यांसाठी बऱ्याच वर्षापासून एक मोहीम राबवत आहे. “आप अच्छा काम करते रहो हम सत्कार करते रहेंगे” या मोहिमे अंतर्गत आज गंगापूर पोलीस स्टेशन नाशिक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपूत यांचा शॉल, बुके व ट्रॉफी देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला तसेच त्यांना गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी बढती मिळाल्याने त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देत अभिनंदन करण्यात आले. यावेळी गंगापूर पोलीस स्टेशनचे मा.पोलिस निरीक्षक मोतीराम पाटील व इतर पोलीस अधिकारी , कर्मचारी तसेच मानवाधिकार न्याय सुरक्षा परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते. सर्वांनी जगवेंद्रसिंग राजपूत यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.