जल जमीन व जैवविविधता टिकवण्यासाठी लोकसहभागाची महत्त्वाची भूमिका….
अक्राणी: तालुक्यातील मांडवी खुर्द येथे सामूहिक वन हक्क समिती समोर जलसाक्षरता समितीचे पानसिंग राहसे यांचे अनुभव कथन…धडगाव तालुक्यातील मांडवी खुर्द या अती दुर्गम भागात सरपंच ग्रामस्थ आणि सामूहिक वन हक्क समिती संयुक्त विद्यमाने सभेचे आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी सामूहिक वनहक्क समिती क्षेत्र, वैयक्तिक वनहक्क क्षेत्र समिती मध्ये विचार विनिमय करण्यात आला. या प्रसंगी जलसाक्षरता समितीचे कार्यकर्ते पानसिंग राहसे यांनी सातपुड्यातील जल, जमीन व जैवविविधता वाचविण्यासाठी नमामि सातपुडा मिशन राबवित असलेल्या उपक्रमाची माहिती दिली. वनराई बंधारे, बांबु लागवड, स्थानिक वृक्ष लागवड, केतकी लागवड व डोंगर उतारावर सीसीटी ची कामे या विषयी करत असलेली कामे यांची मांडणी करुन सामाजिक वनीकरण विभागाच्या उच्चस्तरीय अधिकार्यांना अक्राणी तालुक्यात जलसाक्षरता समिती अक्राणी करीत असलेल्या कामांविषयी अवगत केले. तसेच मांडवी सहीत सातपुड्यात नमामि सातपुडा मिशन राबविणे गरजेचे आहे. तातडीने उपाय योजना न केल्यास हजारो हेक्टर जमीन वाळवंट होण्याची शक्यता आहे.तरी ह्या पध्दतीचा अवलंब करण्याचे आवाहन जलप्रेमी व जलसाक्षरता समिती अक्राणीचे प्रवर्तक प्राचार्य डाॅ एच एम पाटील यांनी समितीला आवाहन केले आहे.या वन हक्क समिती च्या सभेमध्ये अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक डब्ल्यु आर याकबोन ,नाशिक विभागीय वनसंरक्षक गजेंद्र हिरे व नंदुरबार विभागीय उपवनसंरक्षक मकरंद गुजर, तसेच वनक्षेत्रपाल रामकृष्ण लामगे सरपंच मिनाताई राहसे ,वालसिंग राहसे वनपाल फणसे, वनरक्षक बैसाणे ग्रामपंचायत मांडवी खुर्दचे उपसरपंच,मांगीलाल वळवी, सदस्य, भाईदास राहसे, जयसिंग राहसे, गणेश राहसे, सचिन वळवी, गणपत राहसे ,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.