बेधडक मी मराठी न्यूज
तालुका प्रतिनिधी- हेमंत मराठे
मो 9689840855
तळोदा : तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रांझणी येथे रांझणी, बोरवाण, चिनीपाणी व बोंडवाल या शाळांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण परिषद आयोजित करण्यात आली होती . या शिक्षण परिषदेचे अध्यक्ष म्हणून प्रतापपूर केंद्राचे केंद्रप्रमुख रंजना निकुंभे होत्या . प्रमुख पाहुणे म्हणून पालक शिक्षण समितीच्या अध्यक्षा सुवर्णा मराठे तर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष केन्या वसावे, मुख्याधापक,शिक्षकवृंद, विदयार्थी,ग्रामस्थ उपस्थित होते .
सावित्राबाई फुले व देवमोगरा माता यांच्या प्रतिमांचे पूजनाने उद्घाटन करण्यात आले . विद्यार्थ्यांनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले . त्यांचे कौतुक करण्यात येऊन प्रोत्साहन दिले . अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला . जिल्हास्तरीय कला महोत्सवात केंद्रप्रमुख व महिला शिक्षिकांनी शैक्षणिक गाणी सादर केले . त्यांना सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला . नंदकुमार शेंदरे यांनीही कुंटुबियासह कला सादर केली . त्यांचाही सन्मान करण्यात आला . जिल्हास्तरीय कबड्डी क्रिडा प्रकारात विजेता ठरलेल्या संघात संजय पवार यांचाही मोठा वाटा होता . त्यांचाही सन्मान करण्यात आला .
शिक्षण परिषदेत गुणवत्तेबाबत आढावा घेऊन अडचणींवर मात करण्याविषयी मार्गदर्शन, केंद्राच्या गरजांना अनुसरुन प्रशासकीय सूचना रंजना निकुंभे यांनी दिल्या . निपुण महाराष्ट्र अभिमान कृती कार्यक्रमा बद्दल नंदकुमार शेंदरे व रविंद्र पवार यांनी मार्गदर्शन केले . निपुण महाराष्ट्र अभियान कृती कार्यक्रम केंद्र स्तरीय नियोजन व सादरीकरण भिमसिंग वळवी व प्रविण गोसावी यांनी माहिती देऊन गटा गटातील प्रकल्प सादरीकरण करुन घेतले .
या शिक्षण परिषदेचे सुत्रसंचालन प्रतिभा भामरे यांनी मानले .तसेच जमलेल्या सर्व पाहुण्यांचेआभार किशोर भारती यांनी मानले शिक्षण परिषदेच्या यशस्वीतेसाठी रविंद्र वसावे, विजय बोरसे, दिपक गावीत, रोहिदास पावरा, शिवाजी ठाकरे, बादलसिंग वसावे, माधव वळवी यांनी परिश्रम घेतले .