बेधडक मी मराठी न्यूज
तालुका प्रतिनिधी- हेमंत मराठे
मो.9689840855
नंदुरबार: तालुक्यातील बामडोद येथे आजपासून कास्को क्रिकेट बॉल स्पर्धेचे आयोजन उद्घाटन करण्यात आले .श्री विलास भाई पाटील सर वसंत आबा पाटील बांमडोद व योगेश भाऊ राजपूत भास्करी यांच्या संयुक्त संकल्पनेतून क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करून गावातील व पंचक्रोशीतील गावांच्या खेळाडूंना वाव मिळावा म्हणून गावातील तरुणांना एकत्र करून स्पर्धेची नियोजन करण्याचे सांगितले. त्या निमित्ताने माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच मंडई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समिती तळोदा उपसभापती अमोलजी भारती यांना स्पर्धेचे उद्घाटन दरम्यान प्रमुख पाहुणे म्हणून प्राचारण करण्यात आले. व त्यांचे हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.प्रसंगी अमोलजी भारती यांनी गोलंदाजी केली व सरपंच विजय पाडवी यांनी झेंडू फड़ी टोलावत सामन्यात रंगत आणले. प्रसंगी जमलेल्या सर्व क्रिकेट प्रेमिनाअमोलजी यांनी मोलाच्या सल्ला देत सांगितले की मैदानी खेळ खेळल्याने माणसाची आरोग्य नेहमी चांगले राहते. आजची तरुण पिढी ही असे मैदानी खेळ खेळण्याचे सोडून मोबाईल मधील ऑनलाइन खेळाकडे जास्त लक्ष देतात. परिणामी ते मनोरुग्न होतात व कमी वयात चांगल्या आरोग्यास मुकतात असा मोलाच्या सल्ला दिला. त्याचप्रमाणे सरपंच विजय पाडवी म्हणाले की तरुणांनी मैदानी खेळ खेळून उत्तम क्रिकेट पटु बनता येते. व मैदानी खेळामुळे तरुणांमध्ये आपसात आपुलकीचे प्रेम संबंध जोपासले जातात. सदर स्पर्धेत प्रोत्साहन म्हणून प्रथम बक्षीस व आकर्षक ट्रॉफी दहा हजार व द्वितीय बक्षीस 5000 ठेवण्यात आले आहे स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांना प्रवेश फी 1800 रुपये करण्यात आली आहे.तसेच स्पर्धेचे नियम व अटी आयोजकांनी राखून ठेवले आहेत. स्पर्धेचे उद्घाटन करताना कोलदे येथील आदिवासी ब्रिगेडचे अध्यक्ष नितेश दादा वडवी दहिंदुले चे सरपंच विजुभाऊ पाडवी मनीष पाडवी सचिन भाऊ व मोठ्या संख्येने गावातील ग्रामस्थ व क्रिकेटप्रेमी उपस्थित होते.