होलिकोत्सवानंतर घरकुल बांधकामाना येतोय वेग

बेधडक मी मराठी न्यूज

तालुका प्रतिनिधी- हेमंत मराठे
मो.9689840855

तळोदा : तालुक्यातील रांझणी,चिनोदा, रोझवा,प्रतापपुरसह विविध ग्रामीण भागात होलिकोत्सवानंतर घरकुल बांधकामाच्या कामांना गती मिळाली असल्याचे चित्र असून त्यामुळे घरकुल लाभार्थी तसेच त्यांचे कुटुंब व्यस्त असल्याचे चित्र दिसून येत आहे.
परिसरात सध्या शेतीकामे बऱ्याच प्रमाणात आटोपली असून लाभार्थीकडून बांधकाम कामगारांना पाचारण करण्यात येऊन आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने बांधकाम कामगारांना विटा, वाळू सिमेंट यांचे बनवलेले मिश्रण पुरवण्यात येत असून दोन पैसे वाचवले जात आहेत. तसेच कुटुंबप्रमुखाकडून तळोदा शहरातून वाळू, लोखंड, दरवाज्याच्या चौकट, खिडक्या यासह बांधकामासाठी लागणारे बांधकाम साहित्य आणले जात आहे.
होलिकोत्सवामुळे घरकुल बांधकामात काहीसा ब्रेक लागला होता. परंतु आता बांधकाम कामगार, मजूर कामावर येऊ लागल्याने कामे वेगाने सुरू आहेत.

बहुतांश लाभार्थींची विटांसाठी शोधाशोध

सध्या तालुक्यात सर्वत्र घरकुल तसेच इतर बांधकाम सुरू असल्याने विटांची मागणी वाढली असून घरकुल लाभार्थी समूहाने विटभट्टा मालकांना भेटून विटा कधी उपलब्ध होतील, त्यानुसार एकमेकांना विचारात घेऊन आपापल्या घरकुलाच्या बांधकामाचे नियोजन करीत आहेत.
परिसरात मोठ्या प्रमाणावर पाण्याची उपलब्धता असल्याने घरकुलाचे बांधकाम करणे सोयीचे ठरत असून कधी एकदाचे घरकुल पूर्ण होईल यासाठी लाभार्थी मेहनत घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *