बेधडक मी मराठी न्यूज
नंदुरबार: शहादा तालुक्यातील परिवर्धा केंद्रातील काथर्दे खुर्द येथे शिक्षण परिषद जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंदुरबार यांच्या आदेशानुसार शिक्षणपरिषद माहे एप्रिल २०२५ चे पुष्प ८ वे जिल्हा परिषद मराठी शाळा काथर्दे खुर्द येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. सदर शिक्षणपरिषद जिल्हा परिषद मराठी शाळा काथर्दे खुर्द, कोठली त.ह. काथर्दे दिगर पुनर्वसन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी परिवर्धा केंद्राचे केंद्रप्रमुख अशोक देवरे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून काथर्दे शाळेच्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा संगिता पाडवी, मुख्याध्यापक भरत पावरा, सरपंच खंडु ठाकरे, उपसरपंच गणेश भील, पोलिस पाटिल ईश्वर वळवी, सामाजिक कार्यकर्ते तथा साने गुरुजी मित्र मंडळाचे अध्यक्ष मानक चौधरी, पुनर्वसन शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जहांगीर वसावे, कोठली शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अनिलभाऊ ठाकरे, विनोदभाऊ ठाकरे, केंद्रिय मुख्याध्यापक अमृत पाटील, श्रमिक माध्यमिक विद्यालय काथर्दे खुर्द चे मुख्याध्यापक बी.जी माळी, भुषण पाटिल, कन्हैयालाल पाटील, आधार सोनवणे पोलिस सहाय्यक उपनिरीक्षक नंदुरबार, परिवर्धा केंद्रातील सर्व शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक बंधु भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामपंचायत सदस्य सखुबाई सोनवणे, सुनिता कोळी, आशा वर्कर सविता पावरा, अंगणवाडी सेविका रेखा पाटील,माजी सरपंच गौरी वळवी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन, स्वागतगीताने झाली तसेच मुलांनी आदिवासी नृत्य सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली. सदर नृत्य सादरीकरणास तब्बल ४७०० रु. चा बहुमान मिळाला. मनोगतादरम्यान मानक चौधरी यांनी जिल्हा परिषद शाळेत सुरु असलेल्या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले शिक्षक बंधु भगिनी यांच्या कामाचे कौतुक केले. शिवस्मारक समिती सदस्य राजेंद्र पाटील, इंजिनिअर, शहादा राजकीय, सामाजिक क्षेत्रात कार्य करत असलेले एन. डी पाटिल, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त कला शिक्षक चतुर्भुज शिंदे यांनी शिवजयंती निमित्त शहादा येथे आयोजित कार्यक्रमात सुंदर लेझीम सादरीकरण केल्याबद्दल काथर्दे खुर्दच्या चिमुकल्यांना चांगल्या प्रतीच्या स्कुलबॅग वाटप केल्या. वर्षभरातील शैक्षणिक उपक्रमाचे रांगोळीच्या माध्यमातून लक्ष वेधले याकरिता वेदिका जगन पाडवी, सहाय्यक शिक्षिका हर्षदा पाटील यांनी मेहनत घेतली. केंद्रप्रमुख देवरे यांनी मागील परिषदचा आढावा व गुणवतेबाबत चर्चा करून प्रशासकिय सुचना दिल्या. महाराष्ट्र राज्य नंदुरबार जिल्हा प्रहार शिक्षक संघटनेचे शहादा तालुकाध्यक्ष तुकाराम अलट यांनी शिक्षण परिषदेचा मुख्य उद्देश शिक्षणाचे महत्त्व वाढवणे, शिक्षण क्षेत्रात येणाऱ्या समस्यांवर उपाय शोधणे आणि शिक्षणास चालना देणे हा होता. या परिषदेच्या माध्यमातून शिक्षणास प्रोत्साहन मिळेल आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी एक सकारात्मक बदल घडेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. निपुण महाराष्ट्र अभियान कृती विषय, इंग्रजी ग्रेडेड बुक वापरा विषयी मार्गदर्शन शिक्षक शक्ती धनके, ७५ टक्केपेक्षा जास्त अध्ययन क्षमता प्राप्त असलेल्या वर्गशिक्षकांचे अनुभव कथन हा विषय चेतन शिंदे यांनी तर माझा वर्ग माझे नियोजन याविषयी मार्गदर्शन ईश्वर कोळी यांनी केले. वंदे मातरम् गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. शिक्षण परिषद यशस्वीतेसाठी शिक्षक मनोज राठोड, सुनिल म्हेत्रे, खेमा वसावे, श्रीकांत वसईकर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुकाराम अलट तर आभार सुनिल म्हेत्रे यांनी मानले.