आर.टी.ओ.(R.T.O.)चे तीन सहाय्यक निरीक्षक लाच घेताना A.C.Bच्या जाळ्यात

बेधडक मी मराठी न्यूज

ऐकाच वेळी तिन आधिकारी लाच घेताना सापडल्याने राज्यात माेठी खळबळ माजली.

पुसद : येथील एका ड्रायव्हिंग स्कूलमधील प्रशिक्षणार्थी चालकांना परवाना देण्यासाठी लाच स्वीकारताना परिवहन विभागाच्या तीन सहाय्यक निरीक्षकांसह एजंटला ए.सी.बी.(A.C.B.)च्या पथकाने रंगेहात पकडले*.

सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक
*सूरज गोपाल बाहिते*
(वय ३२),
*मयूर सुधाकर मेहकरे*
(वय ३०),
*बिभीषण शिवाजी जाधव*
(वय ३०)
व एजंन्ट
*बलदेव नारायण राठोड*
(वय २९) रा. वाशीम अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

*बाहिते, मेहकरे आणि जाधव* हे यवतमाळच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात कार्यरत आहेत.

तक्रारकर्त्या महिलेचे पुसदला ड्रायव्हिंग स्कूल आहे.

या स्कूलमधील प्रशिक्षणार्थी वाहन चालकांना परवाना देण्यासाठी आवश्यक शुल्कासह प्रत्येकी दोनशे रुपयांची मागणी करण्यात आली.

पैसे दिल्याशिवाय परवाना मिळणार नाही,
असेही बजावले.

शेवटी महिलेने पैसे देण्याचे मान्य करून ए.सी.बी.(A.C.B.)कडे तक्रार दाखल केली.

यानंतर सापळा रचून चौघांनाही ताब्यात घेण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *