नंदुरबार तिरंगा यात्रा उत्साहात; संपूर्ण शहर देशभक्तीच्या रंगात रंगले.!

बेधडक मी मराठी न्यूज, नंदुरबार 

नंदुरबार : मिशन सिदूंर यशस्वी झाल्याबद्दल संपूर्ण देशात तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. नंदुरबार शहरातून देखिल याच माध्यमातून तिरंगा यात्रा काढण्यात आली. देशभक्तीची ज्वाला पेटवणाऱ्या तिरंगा यात्रेने नंदुरबार शहर दणाणले आहे. शहरातील विविध भागातून हजारो उत्साही नागरिकांनी सहभाग घेतला आणि जय हिंदच्या घोषणांनी वातावरण गजबजले. या ‘तिरंगा यात्रा’मुळे संपूर्ण शहरात देशप्रेम आणि एकात्मतेचा संदेश जोमाने दाटला आहे. या यात्रेत ‌‘भारत माता कि जय, वंदे मातरम्‌‍, हम से जो टकरायेगा, मिट्टी में मिल जाएगा’ अशा घोषणांनी शहर अक्षरश: दणाणले होते.

मिशन सिंदूर अंतर्गत भारतीय सैन्याने पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचा नायनाट केला. तसेच संपूर्ण जगाला भारतीय सैन्याने आपली ताकद देखिल दाखवून दिली. भारतीय सैन्याच्या या यशस्वी कामगिरीनिमीत्त देशभरात शुक्रवारी तिरंगा यात्रा काढण्यात आली.

*शहरातील नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद…*

नंदुरबार शहरात देखिल सकाळी तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी पंडित जवाहरलाल नेहरू स्मारकापासून यात्रेला सुरूवात झाली.

या यात्रेत भाजपा प्रदेश महामंत्री विजयभाऊ चौधरी माजी मंत्री आ डॉ विजयकुमार गावित भाजपा जिल्हाध्यक्ष, निलेश माळी, माजी जि प अध्यक्षा डॉ सुप्रिया गावित जिल्हा महामंत्री शसदानंद रघुवंशी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री प्रशांत पाटील श्री पंकज पाठक सर तालुका अध्यक्ष दिपक पाटील शहराध्यक्ष नरेंद्र कांकरिया सह जिल्ह्यातील मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.

*देशभक्तीचा संदेश आणि शहर तिरंगामय…..*

नंदुरबारच्या इतिहासात अशा प्रकारची मोठी तिरंगा यात्रा ठरली असून यात युवक, महिला, विद्यार्थी तसेच वृद्धांनी सहभाग नोंदवला. यात्रेत सहभागी लोकांनी ‘भारत माता की जय’, ‘जय हिंद’ अशा घोषणांनी शहराला देशभक्तीच्या रंगात रंगवले. यामुळे नागरिकांमध्ये एकजूट आणि राष्ट्रीय अभिमान वाढला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *