बेधडक मी मराठी न्यूज-
तालुका प्रतिनिधी- हेमंत मराठे
मो न 9689840855
तळोदा – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या एस एस सी परीक्षेत शहरातील नेमसुशिल व श्रीमोती विद्यामंदिराचा निकाल 100% लागला असून विद्यामंदिराने निकालाची परंपरा कायम ठेवली असून केंद्रात घवघवीत यश संपादन केले.त्यात वैष्णवी चौधरी (94.40),सोहम माळी (92.80%),श्रुती राजपूत (92.20%),रितिक माळी (92.20%)
निधी चौधरी (91.60%) कोमल मराठे (91.60%) तेजल अहिरे (91.20%), या विद्यार्थ्यांनी केंद्रात बाजी मारली विशेष कौतुकास्पद 91 पैकी 75 विद्यार्थी विशेष प्रविण्यासह उत्तीर्ण झाले असून उर्वरित 16 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष निखिलभाई तुरखिया संचालिका सोनाभाभी तुरखिया संस्था उपाध्यक्ष डी एम महाले सचिव संजयभाई पटेल संस्था समन्वयक हर्षिलभाई तुरखिया मुख्या.सुनिल परदेशी मुख्या. भावना डोंगरे सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी आदींनी शुभेच्छा व अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.