पारंपरिक पिकांना फाटा देत रांजणीतील युवा शेतकऱ्यांच्या आंबा व पेरू फळबागाकडे कल!

बेधडक मी मराठी न्युज

तळोदातालुका प्रतिनिधी- हेमंत मराठे
मो.9689840855

तळोदा:- तालुक्यातील रांजणी येथील युवा शेतकरी सुधाकर तुकाराम उगले हे शेती करतात. तसेच शेतात ऊस, कपास ,गहू अशी पिके घेत असतात. परंतु त्यांनी व त्यांच्या मित्र जगदीश भरत चौधरी यांनी पेरू व आंबा फळबागा विषयी सविस्तर माहिती पाहून त्या प्रकारे पेरूची व आंब्यांची शेती करण्याचे ठरवले. पुढे त्यांच्या पुढे असा प्रश्न पडला की आधुनिक व लवकरात लवकर उत्पन्न देणारे पेरू व आंब्याची रोपे कुठे व कसे भेटतील. त्यांनी शोधाशोध सुरू केली शेवटी त्यांना तींत्रज तालुका भूम जिल्हा पंढरपूर या ठिकाणी तपास लागलां.या मध्ये तळोदा ते तिंत्रज गावाचे अंतर सुमारे 490 किलोमीटर इतके अंतरावर असून तेथील रविराज साबळे पाटील यांच्या नर्सरी मध्ये जाऊन रोपांची लागवडीची माहिती घेतली. त्यांना तेथे पेरू या एका रोपाच्या खर्च 60 ते 70 रुपये घरपोच आला आहे. तसेच आत्याधुनिक वाण तायवान पिंक असून उत्पन्नाच्या कालावधी 12 ते 14 महिन्यातच प्रथम उत्पन्न व नंतर सहा सहा महिन्यातून म्हणजेच वर्षातून दोनदा उत्पन्न येत असते.

साधारण हे पेरूच्या बाजारभाव प्रति किलोस 30 रुपये ते 90 रुपये पर्यंत असतो अशी माहिती रोपवाटिकेचे मालक रविराज साबळे पाटील यांनी सांगितले .व पिकांना एकंदरीत लावणीपासून ते बाजारापर्यंत संपूर्ण मार्गदर्शन करणार अशी हमी देत शुभेच्छा दिल्या. तसेच आंबा या फळाचे रोपे धरमपूर गुजरात येथून आधुनिक प्रकारचे केसर या प्रजातीचे वाण तरुण शेतकरी जगदीश भरत चौधरी यांनी प्रतिरोध घरपोच 200 ते 220 रुपये प्रमाणे आणून लागवड केली तसेच दोघे युवक शेतकऱ्यांनी गावात आपण शेतीमध्ये नवीन काही करून शेतीत क्रांती आणण्याच्या मानस त्यांनी केला. व शेतकऱ्यांनी किरकोळ पिके लावण्यापेक्षा असे काही नवीन शेती प्रयोग करून शेतीत बदल घडवावा असा संदेश इतर शेतकऱ्यांना दिल्याचे दिसून येत आहे.

“आंबा व पेरू या फळबागांना येणारा खर्च हा आम्हाला जास्त खर्चिक व न पेलवणारा नसूनआम्हाला कृषी विभागामार्फत काही मदत भेटेल अशी आशा ठेवून आहोत.”

सुधाकर तुकाराम उगले
युवा शेतकरी रांझनी
तालुका तळोदा जिल्हा नंदुरबार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *