देवरे विद्यालयात दप्तर मुक्त “आनंददायी शनिवार” उपक्रमांतर्गत बोधकथा, मनोरंजक खेळांचे आयोजन

बेधडक मी मराठी न्यूज

विखरण –नंदुरबार तालुक्यातील श्री. आप्पासो आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अन्वये आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी वाढावी या हेतूने दप्तर मुक्त आनंददायी उपक्रम राबविण्यात आले त्यात विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.डी.साळुंके यांच्या मार्गदर्शनाव्दारे विद्यार्थ्यांना विविध मौलिक गोष्टी व बोधकथांद्वारे, अध्ययन कला तसेच विविध गावाकडील खेळांचे महत्त्व अधोरेखित करत प्रत्यक्ष खेळ खेळविण्यात आले.विद्यार्थ्यांनी या मनोरंजनात्मक खेळ कृतीमध्ये सहभाग घेतला.सदर उपक्रम संयोजनासाठी क्रीडाशिक्षक व्ही.बी.अहीरे,डॉ.आर.आर.बागुल यांनी संयोजन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *