बेधडक मी मराठी न्यूज, शहादा
शहाद्यात पाच किलो गांजा जप्त; शहादा पोलीस स्टेशन डीबी पथकाची कामगिरी!
शहादा : शहादा पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून कारवाई करून शहादा-प्रकाशा रस्त्यावर 132 केवी शेजारील एका मोटर सायकलवर स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी सुका गांजाची वाहतूक करीत असल्याचा उद्देशाने आलेल्या दोघांना अटक केली. त्याच्याकडून तब्बल 5 किलो 458 ग्राम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला.
खाजन रतन पावरा (30) आणि गोरख मगन पावरा (24) असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत. आरोपी कडून 5 किलो 458 ग्रॅम गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. त्यांच्याकडून 1 लाख 9 हजार 160 रुपये किंमतीचा सुका गांजा, 60 हजार रुपये, किमतीची टीव्हीएस कंपनीची दुचाकी वाहन असा एकूण 2 लाख 72 हजार 640 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या दोन्ही आरोपीस अटक करून त्यांचेविरूध्द शहादा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई नंदुरबार पोलिस अधीक्षक श्रवण दत्त, अपर पोलीस अधीक्षक, आशिष कांबळे विभागीय पोलिस अधिकारी, दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, निलेश देसले , सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, संदीप वाघ, डी बी पथकातील पोलीस उपनिरीक्षक, भुनेश मराठे, दीपक चौधरी, प्रदीप वाघ, विकास शिरसाट,आदींनी केली आहे.