बेधडक मी मराठी न्यूज, शहादा
‘शहादा पोलीस ठाणे, म्हसावद पोलीस ठाणे, व नंदुरबार उपनगर पोलीस ठाणे, तसेच नंदुरबार वाहतूक शाखेत उत्कृष्ट काम करून त्यांनी सर्व सामान्य माणसाच्या मनात छाप पाडून, जनतेला न्याय देणारा शिस्तप्रिय अधिकारी तसेच गुन्हेगारांचे कर्दनकाळ व कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणारे सिंघम अधिकारी म्हणून त्यांची ख्याती असलेले प्रभारी पोलीसअधिकारी राजन मोरे यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे कामाची दाखल घेऊन त्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करून जिल्हा पोलीस निरीक्षक पदावर नेमणूक केली आहे
नंदुरबार: धुळे येथे पोलीस प्रशिक्षण केंद्रात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक राजन मोरे यांची नंदुरबार जिल्हा पोलीस दलात पोलीस निरीक्षक पदावर नेमणूक झाली. पोलीस महासंचालक मुंबई यांचा आदेशाने नंदुरबार जिल्हा पोलीस दलात बदली करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य पोलिस महासंचालक यांनी पदोन्नतीचे आदेश जारी केले आहे. त्यात धुळे येथील पोलिस प्रशिक्षण केंद्राचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजन मोरे यांना पोलिस निरीक्षकपदी पदोन्नती देण्यात आली आहे. राजन मोरे यांची नंदुरबार जिल्हा पोलिस दलात पोलिस निरीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. यापूर्वीही राजन मोरे यांनी नंदुरबार जिल्ह्यात सहाय्यक पोलिस निरीक्षक म्हणून शहादा, म्हसावद, नंदुरबार उपनगर पोलिस ठाणे व नंदुरबार वाहतुक शाखेत कर्तव्य बजविले आहे. वाहतुकीस अडथळा
ठरणाऱ्या बेशिस्त वाहन चालकांवर लगाम लावल्याची धडाकेबाज कामगिरी राजन मोरे यांनी शहादा, नंदुरबार येथे बजावली होती. त्यामुळे कर्तव्यदक्ष व शिस्तप्रिय अधिकारी म्हणून राजन मोरे यांची ओळख झाली होती. राजन मोरे यांनी नंदुरबार जिल्ह्यात यापूर्वी अनेक गुन्हे उघडकीस आणल्याची कामगिरी केली आहे. म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रशस्तीपत्र देवून त्यांचा गौरवही केला होता. शिस्तप्रिय अधिकारी म्हणून जनतेच्या मनात त्यांनी स्थान मिळविले. आता पुन्हा धुळे येथून पदोन्नतीने राजन मोरे हे पोलिस निरीक्षकपदी नंदुरबार जिल्ह्यात कर्तव्य बजविणार आहे.