बेधडक मी मराठी न्यूज
तालुका प्रतिनिधी हेमंत मराठे
मो.9689840855
तळोदा : तालुक्यातीलआयुष्यमान भारत योजनेअंतर्गत आज दिनांक 25/ 08/ 2025 रोजी तालुक्यातील गावांमध्ये मेगा ड्राईव्हच्या अंतर्गत मोफत आयुष्यमान गोल्डन कार्ड ई केवायसी करणे कामी तालुक्यातील-एक धड जाभाई पाडा ,माळ खुर्द, रोझवा प्लाट, बियामाळ, रतनपाडा, राणापुर , गोंदाडे,छोटा धनपूर, गुंजाळे , तरवद पुनर्वसन, रांजणी ,तलावडी, सिलिंगपूर, तोलाच्या पाडा ,बंधारा ,अकरानी या गावांमध्ये प्रामुख्याने आयुष्यमान कार्डची शिबिरे लावण्यात आली होती. जेणेकरून गरजू लाभार्थ्यांना भविष्यात पाच लाखापर्यंत मोफत उपचार शासकीय रुग्णालय व इन पॅनल रुग्णालय याचा लाभ होणार आहे. सर्व लाभार्थ्यांनी या संधीच्या फायदा घेणे सर्व विभागांनी एकमेकांशी समन्वय साधून शिबिर यशस्वी करणे करिता मा. जिल्हाधिकारी व मा. मुख्य कार्यकारी अधिकारी नंदुरबार यांच्या आदेशान्वये सर्व तालुक्यातील आरोग्य यंत्रणा कामी लागले होते.
त्या अनुषंगाने मौजे रांझणी तालुका तळोदा येथे आज दिनांक 25 /08 /2025 रोजी सकाळपासून ठीक नऊ वाजेपासून समुदाय वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कृष्णा पावरा आरोग्य सहाय्यक बागवान सर, वैशाली गरुड ग्रामपंचायत ऑपरेटर अभिमन्यू भवर आशा गट प्रवर्तक ज्योती नारायण जाधव आशा वर्कर सीमा भारती, मंगला मराठे, निशा पाडवी. या आरोग्य अधिकारी कर्मचारी आशा सुपरवायझर आशा वर्कर यांनी सकाळी नऊ ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत एकूण 110 ते 120 लाभार्थ्यांचे आयुष्यमान कार्ड करून देण्यात आले .दिवसभर सर्वर डाऊन ची समस्या उद्भवत असताना देखील संपूर्ण दिवस सर्व कर्मचारी ग्रामपंचायत रांझनी येथे पूर्ण दिवसभर थांबून होते.