बेधडक मी मराठी न्यूज
शहादा : दिनांक ४ सप्टेंबर गुरुवार रोजी *सुफ्फा व इकरा उर्दू शाळेत ईद-ए-मिलादुन्नबी (पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचा जन्मदिन) मोठ्या श्रद्धा व उत्साहात साजरा करण्यात आला.या निमित्ताने शाळेत विशेष वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सकाळ सत्राचे कार्यक्रमाचे उद्घाटक मा.राजू भाई मन्सुरी साहेब (पत्रकार) हे होते. तर अध्यक्षपद मा. मौलाना मुसव्वीर साहेब,यांनी भूषविले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून अन्सार भाई तेली (ARCO), मौलाना अकील , साजीद पठान , जुबेर भाई कुरेशी, हे उपस्थित होते. या स्पर्धेत एकूण पाच गट करण्यात आले होते. स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्साहाने भाग घेतला.विद्यार्थ्यांनी पैगंबर मोहम्मद(स.अ.व) यांचे जीवनचरित्र, शिकवण व सदाचार यांवर हृदयस्पर्शी भाषणे दिली. पैगंबरांचे जीवन हे मानवजातीसाठी मार्गदर्शक आहे. हा संदेश विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे मांडला.
तर दुसरे सत्राचे कार्यक्रमाचे उद्घाटक मा.इद्रीस भाई अन्सारी हे होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.हाजी अकील बागवान होते,तर प्रमुख पाहुणे म्हणुन मा.साजीद पिंजारी साहेब (मुख्याधिकारी शहादा नगर परिषद) यांनी मनोगतातून विध्यार्थ्यांना आपले ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्या दिशेने वाटचाल केली तर आपल्याला यश हमखास मिळते असा मोलाचा सल्ला दिला. मा.इकबाल सर (माजी.मुख्याध्यापक तळोदा) या कार्यक्रमात संस्था अध्यक्ष,मा.मुन्ना भाई कादरी, कार्यध्यक्ष मा.ईश्वर भाई पाटील, उपाध्यक्ष मा.तनवीर भाई तेली, सचिव मा.डॉ नाजीम तेली, मा.जाकीर भाई मनियार, मा.सुरेश भाऊ चव्हाण, व सुफ्फा शाळेचे मुख्याध्यापक मा.जव्वाद अली सैय्यद, तसेच इकरा शाळेचे मुख्याध्यापक मा.राहील खान उपस्थित होते. या स्पर्धेत परिक्षकांची भुमिका नाज़नीन मॅडम, शिरीन मॅडम,अ.रऊफ सर, वसीम पठान सर, रोमाना मॅडम,मौलाना अज़ीम,हाफिज मोईन, हाफिज जुनेद,मौलाना अतिक,यांनी पार पाडली. या स्पर्धेत विजेत्या विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने प्रमाणपत्र व बक्षिस देऊन गौरविण्यात आले.
पहिला गट नर्सरी ते सिनियर के.जी
प्रथम = तुबा तौसिफ शाह
व्दितीय = अरशिया अजहर हुसेन
तृतीय = रिदा अताउल मुस्तुफा खाटीक
दुसरा गट १ ली ते २ री
प्रथम = हम्माद अब्दुल्ला तेली
व्दितीय = सामित शोएब शेख
तृतीय = मरियम वसीम खाट
तिसरा गट ३री ते ४थी
प्रथम= इरम फिरोज खाटीक
व्दितीय = मुसायका मुस्तुफा खाटीक
तृतीय = अस्बा मुस्तुफा मंसुरी
चौथा गट ५ वी ते ७ वी
प्रथम= मिर्झा अश्मिरा अनिस बेग
व्दितीय = तैबा मुस्तकीम बागवान
तृतीय = मारिया शाहीद तेली
पाचवा गट ८ वी ते १० वी
प्रथम = शेख अंशा आबीद
द्वितीय = हुमेरा साजिद भट्टी
द्वितीय= इकरा अकबर बेलदार
तृतीय = तकदीस फातेमा साजिद खान
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सलमान सर व रिजवान सर यांनी केले तर आभार प्रदर्शन राहील सर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कठोर परीश्रम घेतले.
शेवटी सर्व विद्यार्थ्यांना ईद-ए-मिलादुन्नबीच्या शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.