बेधडक मी मराठी न्यूज
धडगाव: धडगाव शहरातील भोईराज सार्वजनिक तरुण गणेश मित्र मंडळाने यंदा गणेशोत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या पोलीस दलाचा अनोख्या पद्धतीने गौरव केला आहे. मंडळाच्या या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
गणेशोत्सव काळात गणेश भक्तांच्या उत्साहाला शिस्त लावण्याचे आणि शहरातील शांतता अबाधित राखण्याचे महत्त्वाचे काम पोलीस करत असतात. त्यांच्या याच योगदानाला आदराने सलाम करण्यासाठी भोईराज सार्वजनिक गणेश मंडळाने हा विशेष सत्कार सोहळा आयोजित केला होता.
या सत्कार सोहळ्यादरम्यान, मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी धडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र जगताप यांच्यासह सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचा श्रीफळ देऊन सन्मान केला. विशेष म्हणजे, यावेळी पोलीस दलातील गृहरक्षक दलातील जवानांना कपड्यांचा वाटप करण्यात आले तर महिला पोलीस कर्मचाऱ्यांना साडी देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. धडगाव शहरामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांचा अशा प्रकारे गौरव करण्याची ही पहिलीच वेळ असल्याने या उपक्रमाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
मंडळाच्या या उपक्रमाने पोलीस दलाचे मनोबल
वाढण्यास मदत होईल, अशी भावना व्यक्त केली जात आहे. कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचा असा सन्मान करून समाजाने त्यांच्याप्रती व्यक्त केलेला आदर भविष्यात त्यांना अधिक चांगल्या प्रकारे काम करण्याची प्रेरणा देईल. भोईराज सार्वजनिक तरुण गणेश मित्र मंडळाने घालून दिलेल्या या आदर्शामुळे इतर मंडळांनाही प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
यावेळी भोईराज सार्वजनिक तरुण गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष दीपक शिवदे, सामाजिक कार्यकर्ते लतेश मोरे,सामजिक कार्यकर्ते टायगर पावरा,उपाध्यक्ष गौतम मोरे, खजिनदार हर्षल शिवदे, सचिव मनीष साठे ,सदस्य पदी संजय साठे,संदीप सूर्यवंशी,पवन ढोले,पीयूष वाडिले ,पंकज सोनवणे ,मनोज वानखेडे,चेतन साठे,करण खेडकर,निलेश साठे,जयेश तमखाने ,संतोष रामोळे यांची निवड करण्यात आली यासोबतच या बैठकीला मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते..