बेधडक मी मराठी न्यूज
तालुका प्रतिनिधी- हेमंत मराठे
मो.9689840855
‘राष्ट्रीय वयोश्री योजना’ अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना मदतीचा हात डॉ.निहांत मेहता मुंबई व डॉ. दिपक शशांत यांचे मोलाचे मार्गदर्शन……
तळोदा : ज्येष्ठ नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र सरकारतर्फे राबवली जाणारी ‘राष्ट्रीय वयोश्री योजना’ तळोदा शहरात मोठ्या उत्साहात पार पडली. हा उपक्रम आमदार राजेश दादा पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली अमन जोहरी यांच्या संकल्पनेतून भाई गल्ली येथे आज रोजी राबविण्यात आला.
या उपक्रमात एकूण 257 ज्येष्ठ नागरिकांचे फॉर्म भरून घेण्यात आले, ज्यामुळे लवकरच त्यांना चालणे, पाहणे व ऐकणे सुलभ होण्यासाठी सहाय्यक उपकरणांचा लाभ मिळणार आहे. केंद्र सरकारच्या या योजनेमुळे ज्येष्ठांना स्वावलंबी बनविण्यास मोठी मदत होणार आहे.
योजनेच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक युवकांनी परिश्रम घेतले. यामध्ये सनी जोहरी, तुषार जोहरी, आकाश भाई, शुभम जोहरी, पराग राणे, विक्की जोहरी, निखिल जोहरी, भरत भाई, किशोर कुंभार, मयूर भाई, गणेश जोहरी व विनायक जोहरी यांचा विशेष उल्लेख करावा लागेल.
ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी नेहमीच पुढाकार घेणारे आमदार राजेश दादा पाडवी व तळोद्यातील सामाजिक कामासाठी नेहमी तत्पर राहणारे अमन जोहरी यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. नागरिकांनीही राजेश दादा पाडवी आणि अमन जोहरी यांचे मनापासून आभार मानले.
स्थानिक पातळीवर सातत्याने जनकल्याणकारी उपक्रम राबविणारे अमन जोहरी यांनी यावेळी विशेष उत्साह दाखवून संपूर्ण टीमचे मार्गदर्शन केले. त्यांच्या सक्रिय सहभागामुळे कार्यक्रम शिस्तबद्ध आणि यशस्वीरीत्या संपन्न झाला.
राष्ट्रीय वयोश्री योजना ही ज्येष्ठांच्या आयुष्यातील एक नवा अध्याय ठरत असून, तळोदा शहरात झालेल्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये समाधान व आनंदाचे वातावरण पसरले आहे.