बेधडक मी मराठी न्यूज
शहादा: शहरातील दोंडाईचा रस्त्यावरील सप्तशृंगी माता मंदिर परिसरातील प्रसिद्ध भगवा चौक येथे नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी भगवा ग्रुप कडून भगवा झेंड्याच्या ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन भगवा ग्रुप यांच्या वतीने करण्यात आले होते.
ध्वजारोहण सोहळ्याचे उद्घाटन शहादा-तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी शहादा पोलीस निरीक्षक निलेश देसले, शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजीत पाटील, तसेच बजरंग ग्रुप, ओम साईराम ग्रुप, भगवा बजरंग वडार वैदू ग्रुप, व शहरातील शिवभक्त व भगवा प्रेमी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मार्गदर्शक जय भगवा बजरंग फाउंडेशनच आदिवासी टायगर सेना व इतर प्रमुख कार्यकर्तेही या वेळी उपस्थित होते. सालाबादप्रमाणे या चौकात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी भगवा ग्रुप कडून भगवा झेंडा उभारण्याची परंमपरा जपली जात आहे.
यावेळी परिसरात ‘जय भगवा’, ‘जय बजरंग’ अशा गजरांनी वातावरण दुमदुमून गेले होते. भगवा झेंडा उभारण्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या व उत्सवाचे औचित्य साजरे केले.