बेधडक मी मराठी न्यूज-
शहादा: औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात जागतिक फार्मासिस्ट दिवस वृक्षारोपण करून उत्साहात साजरा, विद्यार्थ्यानी घेतली फार्मासिस्टची शपथ त्यासोबतच सादर केले पोस्टर सादरीकरण.
संपूर्ण जगभरात 25 सप्टेंबर हा दिवस जागतिक फार्मासिस्ट दिवस म्हणून साजरा करण्यात येत असतो त्याअनुषंगाने पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय शहादा आणि फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने 25 सप्टेंबर 2025 रोजी महाविद्यालयात “आरोग्याचा विचार करा, फार्मासिस्टचा विचार करा” (थिंक हेल्थ,थिंक फार्मासिस्ट) या थीमवर जागतिक फार्मासिस्ट दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयातील विविध कार्यक्रम त्यात वृक्षारोपण, फार्मासिस्ट ची शपथ आणि पोस्टर प्रेझेंटेशन (सादरीकरण) घेण्यात आले. सर्वप्रथम मंडळाचे शैक्षणिक व सामान्य प्रशासन विभागाचे समन्वयक श्री मकरंद भाई पाटील यांच्या हस्ते महाविद्यालयीन परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस.पी.पवार यांच्यासोबत मंडळातील विविध शाखांचे प्राचार्य उपस्थित होते. त्यानंतर महाविद्यालयातील अंतिम वर्षाची विद्यार्थीनी कु. वंशिता गंगोळे हिने सर्व विद्यार्थ्याना तसेच प्राध्यापक यांना फार्मासिस्ट ची शपथ महाविद्यालयातील प्रांगणात दिली यावेळी मोठ्या संख्येने कनिष्ठ (डी.फार्मसी) आणि वरिष्ठ (बी.फार्मसी) महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. त्यानंतर विद्यार्थ्यांनी “जागतिक आरोग्य गरजा पूर्ण करणारा फार्मासिस्ट”, “जेनेरिक औषधाबद्दल जागरूकता”, “रुग्ण समुपदेशन”, “मादक पदार्थांचा गैरवापर कमी करणे”, सध्याच्या चांगल्या उत्पादन पद्धतींची भूमिका” हे विषय देऊन आपले पोस्टर महाविद्यालयाच्या आवारात लावले होते. द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी कु.अंजलीकुमार झा हीने फार्मासिस्ट दिवसानिमित्ताने प्रभावी आणि आकर्षक असे अभिवादन पत्र (ग्रीटिंग कार्ड) महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस.पी.पवार यांना भेट दिले. सदर कार्यक्रमासाठी पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष श्री जगदीशभाई पाटील, सचिव श्रीमती ताईसाहेब कमलताई पाटील, शैक्षणिक व सामान्य प्रशासन विभागाचे समन्वयक श्री मकरंद भाई पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा मंडळाचे संचालक मयूरभाई पाटील, प्राचार्य डॉ.एस.पी.पवार यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. मानसी धनकानी तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले. यावेळी मोठ्या संख्येने कनिष्ठ (डी.फार्मसी) आणि वरिष्ठ (बी.फार्मसी) महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.