प्रतापपूर येथे मागील दोन वर्षापासून युवक करत आहेत दुर्गामता दौड चे आयोजन!

बेधडक मी मराठी न्यूज

तालुका प्रतिनिधी- हेमंत मराठे मो.9689840855

तळोदा:  तालुक्यातील प्रतापूर येथे मागील दोन वर्षापासून गावातील युवक हे नवरात्र उत्सव खूप मोठ्या आनंदाने साजरा करत असतात. सर्व युवक एकत्र येऊन गरबा प्रेमी मध्ये उत्सुकता निर्माण करून कार्यक्रमाचे मोठे नियोजन करत असतात. त्याचप्रमाणे युवकांना देखील गावातील महिलावर्ग युवती तसेच तरुण मित्र गावातील सर्व ग्रामस्थ हे या युवकांच्या उत्सवावर कार्यक्रमाची शोभा वाढवत असतात. नवरात्र उत्सवाला प्रारंभ 22 सप्टेंबर पासून सुरुवात झाली. त्या दिवसापासून 2 ऑक्टोंबर पर्यंत नियमित दररोज पहाटे साडेपाच वाजेपासून गावात दुर्गा मातेची मशाल घेऊन मिरवणूक काढत असतात. त्याचप्रमाणे गावामध्ये शिवगर्जना, पोवाडे तसेच दुर्गामातेच्या भक्तीमय भावगीत म्हणत संपूर्ण गावामध्ये मिरवणूक काढत असतात मिरवणुकीत प्रामुख्याने आकर्षण म्हणजे सर्व युवक हे पांढरे सदरा ,गांधी टोपी व भगवा रुमाल गडामध्ये असतो. तसेच दोन तास मिरवणूक झाल्यानंतर सकाळी साडेसात वाजेला ते छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे येऊन महाराजांच्या प्रतिमेची आरती होते. या मिरवणुकीला प्रामुख्याने गावातील युवक जिग्नेश अनिल मराठे हा हिंदू सहाय्य सेवा समितीच्या सक्रिय कार्यकर्ता असून त्याच्या संकल्पनेतूनच या दुर्गामाता दौड चे नियोजन करण्यात आले .त्याने गावाचे सर्व युवकांना एकत्र करून असं काही नवीन करण्याचे संधी उपलब्ध करून दिली. गावातील दुर्गा माता दौड साठी गोपाल मनीलाल शिंदे,मनोज पाटील,हे मेहनत घेतात. व त्यांना सखोल मार्गदर्शन हे गावातील सामाजिक कार्यकर्ते संजय मराठे हे करत असतात. दुर्गा माता दौड पूर्ण झाल्यावर सर्व गावातील लोक एकत्र येऊन श्री प्रभू रामचंद्र चे मंदिरात येऊन आरतीने समापन होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *