बेधडक मी मराठी न्यूज
शहादा: “ना कोणता अजेंडा…ना विषय ,ना कोणाचं भाषण”...फक्त आपण एकमेकांना जाणणारी,जपणारी माणसं आहोत. म्हणून एकतेचा, प्रेमाचा परस्परांना स्नेहभावनेच्या संदेश देत पहिल्यांदाच शहादा शहरात सर्व जाती धर्मातील नागरिक एकाच ठिकाणी एकत्रित एकमेकांना शुभेच्छा देऊन आनंदोत्सवात दिवाळी सण साजरा करताना दिसले. निमित्त होते शहादा फस्ट ने आयोजित केलेल्या दिवाळी स्नेहमीलन सोहळ्याचे. शहरात प्रथमच आयोजित केलेल्या या दिवाळी स्नेहमिलन सोहळ्याला शहरवासीयांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.
शहादा येथील डोंगरगांव रस्त्यावरील अहिंसा चौक परिसरातील
अन्नपूर्णा लॉन्स येथे शहादा फर्स्ट च्या वतीने आयोजित केलेल्या दीपावली स्नेहमिलन सोहळ्यास शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला विशेष म्हणजे या स्नेहाच्या प्रकाश सोहळ्याला महिलांनीही उपस्थिती लावली. दिवाळी सण विविध कारणांसाठी साजरा केला जातो. दिवाळी हा प्रकाशोत्सव आहे. जो अंधारावर प्रकाशाच्या आणि अज्ञानावर ज्ञानाच्या विजय दर्शवितो. शहादा शहरातील काही समस्या आहेत ज्या ठिकाणी प्रशासनाची व्याप्ती नाही त्या समस्या सोडविण्यासाठी शहरातील काही मित्र एकत्रित येत शहादा फर्स्ट या संकल्पनेची मुहूर्त वेढ रोवली. पुढे या त मित्रांच्या गोतावळा जमत संख्याही वाढत गेली. आणि कार्यक्रमांची यादी ही वाढली. आरोग्य स्वच्छता आणि राष्ट्रीय एकात्मता या विषयांवर सर्वांचे एकमत होऊन कार्यक्रमाच्या श्री गणेशा झाला. कोरोना काळात सामाजिक कार्यकर्ते अभिजीत पाटील यांच्या गंगोत्री फाउंडेशनला जीवनावश्यक वस्तू किट वाटपात शहादा फर्स्ट च्या स्वयंसेवकांनी सहकार्य करीत खारीचा वाटा उचलला त्याचबरोबर शहराच्या मध्यवर्ती भागात पालिकेच्या शाळा क्रमांक ९ व १६ मध्ये अद्यावत इलायब्ररीची इमारत उभी आहे त्या परिसरात चिखल आणि झाडे झुडपे वाले होती ही सर्व स्वच्छता नगर परिषद शहाद्याच्या सहकार्याने शहादा फसणे हटवली. शहराचा विस्तार वाढत असताना अनेक कॉलनी परिसरांमधील खाली भूखंडांमध्ये डासांची उत्पत्ती , मोकाट प्राण्यांच्या संचार, अस्वच्छता हे सारे दूर करण्यासाठी माझी वसुंधरा योजनेअंतर्गत शहादा फस च्या वतीने प्रतिनिधिक स्वरूपात त्या भूखंडावरची काटेरी झुडपे तोडण्यात आली साथजन्य आजार मुख्यत्वे डासांच्या उत्पत्ती पासून होतात कॉलण्यांमध्ये निवासी घरांवर सेफ्टीपाईप वर मच्छरदाणीची जाळी बांधली तर डासांची उत्पत्ती थांबेल म्हणून हजारेक जाळ्यांचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर शहरातील अन्य सामाजिक संस्थांना जवळ घेत वेळोवेळी स्वच्छता मोहीम राबविली. शहादा फर्स्ट च्या या लोकोपयोगी उपक्रमात विविध संघटनांचे स्वयंसेवक, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी ,कार्यकर्ते ,डॉक्टर ,वकील ,पत्रकार, व्यापारी आदींसह अनेक मान्यवर आहेत. शहादा शहरातील समस्यांच्या आढावा घेण्यासाठी शहरातील विकास हायस्कूलच्या क्रीडांगणावर शहादा फर्स्ट ची वेळोवेळी बैठक होऊन मंथन करत उपायोजनाही शोधल्या जातात.