आयान मल्टी ट्रेड साखर कारखाना समशेरपूर यांच्यामार्फत शेतकऱ्यांना दिवाळी निमित्त साखर वाटप!

बेधडक मी मराठी न्यूज

तळोदा प्रतिनिधी -हेमंत मराठे मो.9689840855

तळोदा-: आयांन एलएलपी युनिट नंबर 1समशेरपुर तालुका जिल्हा नंदुरबार यांच्या मार्फत सर्व उत्पादन शेतकऱ्यांना दिवाळी आनंदात साजरी व्हावी म्हणून गाढप हंगाम सन 2024- 25 करिता ज्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आयान मल्टी ट्रेड नं 1 या साखर कारखान्यास ऊस गाडपास पाठवला होता त्या शेतकऱ्यांना दि 20/10/2025 पासून ते दि 28/10/2025पर्यंत दिवाळी सणाकरिता सवलतीच्या दरात साखर वाटप होणार असून ऊस गाळपासाठीआलेल्या मे.टनेजचे स्लॅब प्रमाणे पती किलो रुपये वीस मात्र दराने कारखाना साईट समशेरपुर तालुका जिल्हा नंदुरबार या ठिकाणी रोखीने वाटप करण्यात येणार आहे. ऊस पुरवठा स्लॅब हा

1)01 मे.टन ते 30 मे टन यांना 8 कीलोग्राम

2,)31 मे टन ते 60 मे टन यांना 15 कीलोग्राम

3) 61मे टन ते 80 मे साठी 20 किलोग्रम

4)81 मे टन ते 100 मे साठी 25 किलोग्राम

5)101 मे टन पासूनपुढे 35 कीलोग्रम.

याप्रमाणे वाटप करण्यात येणार आहे .तरी सर्व ऊस गाडप शेतकरी यांनी कारखान्यावरती आपले स्वतःचे ओडखपत्र आधार कार्ड व पॅन कार्ड घेऊन कारखान्यावर येऊन घेऊन जाणे असे आव्हान कारखान्याच्या कर्मचाऱ्यांमार्फत करण्यात आलेले आहे.

तर दुसरीकडे बागायतदार यांच्यामार्फत अशी चर्चा होत आहे की ज्याप्रमाणे आपला ऊस गाडपसाठी गट ऑफिस वरती नोंद करून ऊस तोडणी होत असते. त्याप्रमाणे गटावरती सर्व शेतकऱ्यांच्या नोद असतात त्याप्रमाणे मिळणारी साखर ही गट ऑफिस वरती देण्यात यावी अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये होत असल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे या शेतकऱ्यांच्या ऊस गाळप हा 01ते 30 मेट्रिक टन मध्ये तोडणी झाली असेल त्यांनी 25 ते 30 किलोमीटर कारखान्यावरती जाऊन साखर घेणे कितपत योग्य आहे अशी एकच चर्चा होताना दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *