शहादा पालिका निवडणुकीत अभिजीत पाटील यांची “जनता विकास आघाडी”

सर्व २९ जागांवर नगरसेवक पदाचे व एक नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार देऊन जनता विकास आघाडी चा माध्यमातून निवडणुकीच्या मैदानात उतरणार..

शहादा: शहादा पालिका निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षाच्या भरोशावर न राहता शहादेकर जनता व परिसरातील हितचिंतकांच्या पाठिंब्यावर सर्व २९ जागांवर नगरसेवक पदाचे व एक नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार देऊन जनता विकास आघाडी चा माध्यमातून निवडणुकीच्या मैदानात उतरत आहोत. आमच्या कुठल्याही राजकीय पक्षाशी किंवा विचारधारेशी वाद नाही.शहादा शहराच्या विकासाचा एकमेव अजेंडा जनतेसमोर ठेवून निवडणूक लढणार आहोत. असे शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजीत पाटील यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.

येथील पालिका निवडणुकीत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजीत पाटील नेमक्या कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवतात की अपक्ष लढतात याविषयी नागरिकांमध्ये उत्सुकता होती आज त्यांनी त्यांच्या गंगोत्री निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन आगामी निवडणुक जनता विकास आघाडी मार्फत लढविली जाईल असे स्पष्ट केले. यावेळी श्री पाटील म्हणाले की परिसरातील सर्व राजकीय पक्षाच्या विचारधारेचे लोक ,नागरिक तरुण, महिलांनी शहादा शहराच्या सर्वांगीण विकासाच्या विचार करून मतदान करावे. गेल्या नऊ वर्षांमध्ये कोणी काय काम केले आहे याचा अभ्यास करून विचारपूर्वक जर निर्णय घेतला तर निश्चितपणे जनता विकास आघाडी जे आमच्या पक्षावर आम्ही निवडणूक लढवणार आहोत त्याच्या विचार सर्वांच्या मनात सर्वप्रथम राहील असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. शहादेकर जनता परिसरातील लोकं आमच्या सोबत राहतील या विश्वासासह आम्ही प्रचाराला लागलो आहोत सर्व उमेदवार पूर्ण ताकदीने निवडणूक लढवतील हे देखील त्यांनी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगितले.
शहरात असंख्य प्रश्न आहेत. त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी जनता विकास आघाडीच्या माध्यमातून काय करायचे आहे ते आम्ही लवकरच जाहीरनाम्याच्या माध्यमातून सांगणार आहोत. शहराचे सर्व प्रश्न एकत्रित करणार आणि ते जाहीरनाम्याच्या माध्यमातून लोकांच्या समोर मांडणार असल्याचेही त्यांनी सांगितले. लवकरच सर्व उमेदवारांची घोषणा ही केली जाईल. सगळ्यांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवून ही निवडणूक लढवली जाणार आहे.शहरातील सर्व कार्यकर्ते, हितचिंतक ,नागरिक यांना विश्वासात घेतल्यानंतरच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार जाहीर केला जाणार आहे.जनता विकास आघाडीच्या माध्यमातून सर्व २९ नगरसेवक व एक नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार या निवडणुकीत उभे करणार असल्याचे स्पष्ट केले. सक्षम आणि प्रबळ उमेदवार जनता विकास आघाडी कडून इच्छुक असतील तर निश्चितपणे त्यांच्या विचार प्राध्यान्याने करू. सर्व इच्छुकांचे मेरीट बघूनच उमेदवारी दिली जाईल. आजच्या परिस्थितीत जे इच्छुक आहेत त्यांच्या पलीकडे जाऊन अजून कोणी इच्छुक असतील त्यांच्याही विचार केला जाईल. परंतु चांगले उमेदवार ,निवडून येण्याची क्षमता असलेले, व्हिजन असलेले, समाजकारणाचे जान असलेले उमेदवार या शहरासाठी असले पाहिजे.नगरपालिकेची किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक कशी लढवली पाहिजे या बाबतीमध्ये सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांशी, कार्यकर्त्यांशी चर्चा झाली आहे. यापूर्वी वेगवेगळ्या पक्षांमध्ये काम केल्याच्या अनुभव आहे. परंतु सध्या वैयक्तिक रित्या अपक्ष आहे. राजकीय पक्षांनी जर कधी अटी शर्तीसह आम्हाला सोबत घेतलं ते देखील त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांवर अन्यायकारक होईल. आमच्या सोबत जे आहेत त्यांच्यासाठी पण अडचणीचे ठरेल म्हणून सगळ्यांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवून ही लढत लढणार आहोत. शहादा शहराच्या विकास हा एकमेव अजेंडा जनतेसमोर ठेवून जनता विकास आघाडी मार्फत निवडणूक लढविली जाईल असे श्री पाटील यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *