लाखापूर माध्यमिक विद्यालयात विद्यार्थी दिन उत्साहात साजरा

विद्यार्थी दिनानिमित्त विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप

तळोदा : तालुक्यातील लाखापुर फॉरेस्ट येथील माध्यमिक विद्यालयात ७ नोव्हेंबर *’विद्यार्थी दिवस’* अत्यंत उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना ज्ञानाची गोडी लागावी आणि त्यांच्या ज्ञानात भर पडावी, या उदात्त हेतूने यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक योगेश पाटील हे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक विनोद राणे यांनी आपल्या ओघवत्या शैलीत केले.

याप्रसंगी संजय पाटील आणि फिरोजअली सय्यद यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत विद्यार्थी दिनाचे महत्त्व पटवून दिले आणि वाचनामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला कशी चालना मिळते, यावर सखोल विचार मांडले. तसेच उपशिक्षक मंगल पावरा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याविषयी माहिती देत सविस्तर मार्गदर्शनात

जातीयता आणि अस्पृश्यता: डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘ अनुसूचित जातीमध्ये समाजात जन्मले होते, त्याकाळी समाजात ‘अस्पृश्य’ मानले जात असे. या अस्पृश्यतेमुळे त्यांना आणि त्यांच्या समाजातील इतर मुलांना अनेक मानवी हक्कांवरून वंचित ठेवले गेले होते.

*शालेय प्रवेश* जरी ब्रिटिशांच्या राजवटीत काही प्रमाणात शिक्षण सर्वांसाठी खुले झाले असले तरी, सामाजिक बहिष्कारामुळे सवर्ण विद्यार्थ्यांसोबत बसून शिकणे त्यांना शक्य नव्हते.

*वर्गाबाहेर बसावे लागे*: डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्यासारख्या इतर अस्पृश्य विद्यार्थ्यांना वर्गाच्या आत बसण्याची परवानगी नव्हती. त्यांना वर्गाच्या बाहेर, दाराजवळ किंवा कोपऱ्यात बसून शिक्षण घ्यावे लागे. शिक्षकांनी फळ्यावर लिहिलेले त्यांना अस्पष्ट दिसायचे आणि अनेक गोष्टी ऐकू येत नसत.

अपमानजनक वागणूक: अनेकदा शिक्षक किंवा सवर्ण विद्यार्थी त्यांच्याशी नीट वागत नसत. त्यांना सतत त्यांच्या ‘जाती’ची जाणीव करून दिली जात असे.

या भेदभावाच्या अनुभवांमुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण पूर्ण करून भारतातून जातीयता नष्ट करण्याचा आणि समानता प्रस्थापित करण्याचा संकल्प केला. त्यांनी आपले जीवन दलित आणि शोषित समाजाच्या हक्कांसाठी समर्पित केले.

समारोप प्रसंगी, आभार प्रदर्शन संजय पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक योगेश पाटील, संजय पाटील, मंगल पावरा,फिरोजअली सय्यद, चांदो पाडवी ,विनोद राणे, अशोक महाले, सुवर्णा कोळी,विजय पवार आणि सागर पाडवी आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *