बेधडक मी मराठी न्यूज
तालुका प्रतिनिधी – हेमंत मराठे
मो.9689840855
तळोदा : तालुक्यातील प्रतापूर रांजणी चीनोदा गोपाळपूर जीवन नगर परिसरात 30 ऑक्टोबर व 1 नोव्हेंबर रोजी दुबार आलेल्या अवकाळी पावसामुळे सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झालेले होते. काही ठिकाणी तर शेतामध्ये तळ्याचे स्वरूप आले होते व संपूर्ण सोयाबीनचे पीक हे पाण्याखाली गेले होते. सोयाबीनची काढणी केलेल्या पिकाची गुणवत्ता घटली असल्याने एकरी उत्पन्नात घट तसेच भावातही मोठा फटका बसणार आहे.
दरम्यान अवकाळी पावसामुळे रांझनी परिसरात जवळपास 50 एकर क्षेत्रातील सोयाबीन पीक हे खराब झाले असून दाण्यांमध्ये कोण फुटल्याने तसेच पीक पाण्याखाली गेल्यामुळे सडक असल्याचे चित्र दिसून आले होते. त्यामुळे सोयाबीन केलेल्या पेल्याच्या खर्च निघेल की नाही याची चिंता शेतकऱ्यांमध्ये सतावत असल्याचे चित्र दिसून आले आहे. परिणामी कृषी विभागाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावीअशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
रांझनी येथील प्रगतिशील शेतकरी हेमराज भारती यांनी बेधडक मी मराठी न्यूज शी बोलताना सांगितले की सहा एकर सोयाबीनच्या पेरा केला होता. पिकाचे संगोपन चांगल्या प्रकारे केले व पिक देखील जोमात दिसून येत होते. चांगल्या उत्पन्नाची आशा होती. मात्र स्वतःच्या अवकाळी पावसामुळे सोयाबीन पीक पूर्ण वाया गेलेअसून संबंधित विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करून नुकसान भरपाई मिळवून द्यावी.