शहाद्यात सर्वच राजकीय पक्षांमध्ये आघाडी किंवा युतीबाबत संभ्रम कायम; इच्छुकांची धाकधूक वाढली

बेधडक मी मराठी न्यूज

कार्यकारी संपादक- नरेंद्र बागले
मो.9421486054

शहादा : अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या पालिका निवडणुकांचा बिगुल अखेर वाजला. १० ते १७ नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत असली तरी अद्याप शहादा पालिके संदर्भात अधिकृतरित्या कोणत्याही राजकीय पक्षाकडून आघाडी – युती कि स्वबळावर निवडणूक लढवायची हे कोडे अद्याप सुटले नसल्याने अनेक इच्छुक उमेदवारांमध्ये धाकधूक वाढली आहे. असे असले तरी काही इच्छुकांकडून आपले तिकीट पक्के असल्याचे म्हणत सोशल मीडिया वरून प्रचारही सुरू केल्याने आतापासूनच राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे.

निवडणूक आयोगाने पालिका निवडणुकांचा बिगुल वाजविल्याने तब्बल गेल्या चार वर्षापासून प्रशासक राज असलेल्या शहादा नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर पालिकेच्या माध्यमातून शहराच्या चेहरा मोहरा बदलण्यासाठी अनेक इच्छुक निवडणूक लढविण्यासाठी सरसावले आहेत.इच्छुकांची संख्या पाहता सर्वच राजकीय पक्षांना सर्व समावेशक उमेदवार शोधण्याची कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत कमालीची चुरस असण्याची चिन्हे दिसत आहेत. येथील नगराध्यक्षपद नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी खुले असल्याने नवइच्छुकांसह काही प्रस्थापितही निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. मात्र अद्याप कोणत्याही राजकीय पक्षामार्फत अधिकृतरित्या उमेदवारी किंवा आघाडी युती घोषित झालेली नाही. त्यामुळे त्यामुळे इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे अनेक कार्यकर्ते स्वबळाची भाषा वापरत असले तरी वरिष्ठांच्या निर्णयावर उमेदवारांचे भवितव्य. अवलंबून राहणार आहे सत्ताधारी पक्षातील शिवसेना( शिंदे गट) ,राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) भाजपसोबत युती करतील की स्वतंत्र उमेदवार देतील याबाबत अद्याप स्पष्टता नाही. दुसरीकडे महाविकास आघाडी, एम आय एम व इतर राजकीय पक्ष काय भूमिका घेतात यावरही बहुतांश राजकीय समीकरणे अवलंबून आहेत. सध्याची येथील राजकीय परिस्थिती व स्थानिक नेत्यांमधील आपसातील सख्य पाहता प्रथमदर्शनी सत्ताधारी पक्ष एकत्रित लढण्याची शक्यता अद्यापही धूसर वाटत असली तरी युती व आघाडी तसेच पक्षाच्या अंतरीमादेश यावरच निवडणुकीचे अंतिम समीकरण अवलंबून राहणार आहे. दरम्यान कोणत्याही राजकीय पक्षाची आघाडी अथवा युती अद्याप घोषित झाली नसल्याने अनेक इच्छुक गॅस वर आहेत.

राजकीय भुकंपाची शक्यता…?

  • पालिकेची आचारसंहिता जाहीर होताच इच्छुक उमेदवार आपापल्या पक्ष व नेत्यांकडे तिकिटासाठी फिल्डिंग लावून बसलेले असतानाच दुसरीकडे मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजीत पाटील यांच्या भूमिकेकडे शहरवासीयांचे लक्ष लागून आहे. श्री पाटील सध्या कोणत्याही पक्षात नसल्याने पालिकेची निवडणूक नेमक्या कोणत्या राजकीय पक्षाकडून लढतील की स्वतंत्र आघाडी मार्फत लढविली जाते याकडे विरोधकांसह शहरवासीयांचे लक्ष असतानाच त्यांनी जनता विकास आघाडीच्या माध्यमातून या निवडणुकीत नगराध्यक्षपदासह सर्व उमेदवार उभे करणार असल्याचे जाहीर करून बॉम्ब फोडला आहे तसे पाहता सर्व पक्षीय नेत्यांशी श्री पाटील यांचे सलोख्याचे संबंध आहेत.मात्र निवडणुकीच्या तोंडावर त्यांची भूमिका निश्चितच लक्षवेधी ठरणार आहे.त्यांच्या या भूमिके नंतर शहरात राजकीय भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *