
शहादा :- शहादा येथील कर्मसाक्षी प्रेमचंद जाधव शैक्षणिक संकुलातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी संस्थेचे संस्थापक स्व.कर्मसाक्षी प्रेमचंद जाधव यांच्या जयंतीनिमित्त वरूळ-कानडी तालुका शहादा येथील गो शाळेला एक मोठा टेम्पो भरून चारा देण्यात आला.या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.
कर्मसाक्षी प्रेमचंद जाधव शैक्षणिक संकुल तर्फे शालेय उपक्रमाव्यतिरिक्त शहर सह परिसरात संस्थेचे सचिव प्रा.संजय जाधव व सोनामाई शिक्षण संस्थेच्या सचिव वर्षा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक सामाजिक उपक्रम राबवले जात असतात.
शैक्षणिक संकुलातील कर्मचाऱ्यांनी व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वखुशीने गोशाळेतील गाईंना चारा उपलब्ध व्हावा म्हणून एक आपली सामाजिक बांधिलकी असल्याने योगदान दिले.एक टेम्पो चारा खरेदी करून गोशाळेला भेट देण्यात आला.
वरूळ-कानडी येथील गोशाळेत गाईंना चारा देत असताना संस्थेचे सचिव प्राध्यापक संजय जाधव वर्षा जाधव शैक्षणिक संकुलाचे प्रशासकीय प्रमुख प्राध्यापक डॉक्टर हिमांशू जाधव प्राचार्य महेंद्र मोरे उप मुख्याध्यापक जे.एम.पाटील उपप्राचार्य जे.बी.पवार प्रा.नंदलाल निझरे महाविद्यालयाचे लेखनिक विजय पवार उपस्थित होते.