केळीच्या भावात मोठी घसरण; शेतकरी मेटाकुटीला तर व्यापाऱ्यांचे चांगभले

 

(कार्यकारी संपादक -नरेंद्र बागले)

शहादा:- केळीला मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी बाजारात प्रति क्विंटल जेमतेम ५०० रुपये भाव मिळत असल्याने,

केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला तर व्यापाऱ्यांचे चांगभले होत चित्र दिसत आहे

केळी वर उत्पादन खर्च भरमसाट वाढला

•असताना केळीला मिळणारा अल्प भाव व नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे पिकांचे नुकसान यामुळे शेतकरी हतबल झाला आहे विविध सण उत्सवां दरम्यान केळीला विशेष मागणी असते. त्यामुळे केळीच्या भावात चांगली वाढ होते या उस्तवांमध्ये केळीला एक हजार ५०० ते एक हजार ७०० रुपये क्विंटल दरमिळतो.

एकरी एक ते दीड लाखांचे उत्पन्न होत असल्यामुळे शहादा तालुक्यातील अनेक शेतकरी केळी पिकाला प्राधान्य देतात त्यातचअनेक शेतकऱ्यांनी शेतामध्ये

सिंचनाची सोय करून केळीची लागवडीकडे विशेष लक्ष देत असल्याने केळीची उत्पादन वाढले आहे

मात्र, यावर्षी संपूर्ण देशातच अतिवृष्टी व पूर सदृष्य परिस्थितीमुळे केळीच्या निर्यातीत अडचणी आल्याने केळी बाहेरील राज्यात पाठवता आली नाही. त्यामुळे केळीची मागणी घटली आहे बाजारातील मागणीतील घट आणि उत्पादन मात्र कायम राहिल्याने भाव पडले आहेत. केळीचे दर गत दोन ते तीन महिन्यांपासून ४०० ते ५०० रुपये पर्यंत घसरले आहेत परिणामी यंदा भाव नसल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांनाआर्थिक नुकसानीचा फटका बसत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *