बेधडक मी मराठी न्यूज सारंगखेडा

शहादा सारंगखेडा:- सारंगखेडा येथील एका सर्वसामान्य अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांच्या मुलीने आपल्या मेहनतीच्या बळावर तिने विद्यापीठात सुवर्णपदक मिळवले संघर्ष, कष्ट ,जिद्द , परिस्थितीची जाण ठेवत आणि मेहनतीच्या बळावर जे यश मिळवले ते साऱ्या पुढील शैक्षणिक वाटचाल करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तिने नवी दिशा दाखवली आहे .तिची प्रेरणा इतर विद्यार्थीही घेतील तसेच ही बाब तिच्या कुटुंबासाठी, समाजासाठी गावासाठी अभिमानाची बाब आहे व इतर विद्यार्थ्यांसाठी ती आदर्श ठरली आहे असे प्रतिपादन राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा विद्यमान आ डॉ विजयकुमार गावित यांनी तिच्या सन्मानावेळी हे गौरवोद्गार काढले .
शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील आकांक्षा जितेंद्रसिंग गिरासे हिने कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव अंतर्गत २०२५ वर्षासाठी एम एस सी पदविका संगणक शास्त्र अर्थात कम्प्युटर सायन्स मध्ये विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता यादीत प्रथम स्थान मिळवत विद्यापीठात सुवर्णपदक मिळवले तिच्या सन्मान राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा आ डॉ विजयकुमार गावित यांनी केला याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या माजी सभापती हेमलता शितोळे पाटील उद्योजक शशिकांत पाटील गणेश पाटील ऋषिकेश गिरासे ,गोपाल कुवर, राहुल कुवर,विजय महाले, अशोक पाटील,दिलीप पाटील,उचित पाटील,, दलपत गिरासे, जयसिंग गिरासे,ऋषिकेश गिरासे, नूरपाल गिरासे, आदी उपस्थित होते डॉ गावित पुढे म्हणाले
विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या आणि व्यक्तिमत्त्वाचा पाया शाळेतच रचला जातो शाळेत मिळालेल्या शिक्षणाच्या आणि कुटुंबातील संस्कार मूल्याचा आधार हा पुढील शिक्षणातील प्रवासात महत्त्वाचा असतो .शाळेत मिळवणाऱ्या शिक्षणावरच भवितव्य अवलंबून असते त्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या प्रवाहात यावे असे देखील यावेळी डॉक्टर गावित यांनी सांगितले. आकांक्षा गिरासे चे पहिली ते पाचवी शिक्षण हस्ती पब्लिक स्कूल दोंडाईचा, सहावी ते दहावी दहावी अहिंसा पब्लिक स्कूल दोंडाईचा, उच्च माध्यमिक जीएफ पाटील उच्च माध्यमिक विद्यालय शहादा व पदवीपर्यंत शहादा तालुका को-ऑपरेटिव्ह एज्युकेशन सोसायटी सायन्स सीनियर कॉलेज शहादा, व संगणक शास्त्राचे शिक्षण शिरपूर येथील आरसी पटेल आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज येथून पदवित्तर चे शिक्षण घेतले. प्रतिक्रिया. जिद्द चिकाटी मेहनत आणि पालकांच्या पाल्याप्रती अपेक्षांचा सदैव विसर डोळ्यासमोर ठेवला तर यश संपादन करायला कोणतीही अडचण येत नाही. आकांक्षा गिरासे. शिक्षणकार्यक्रमाचे प्रास्ताविक भारत गिरासे यांनी केले सूत्रसंचालन जितेंद्र गिरासे यांनी केले